शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

Diwali 2020 : दिवाळीची साफसफाई करताना 'या' टिप्स वापराल; तर कमी वेळात घर होईल चकाचक! 

By manali.bagul | Published: November 08, 2020 6:05 PM

Diwali 2020 cleaning tips: तुम्हाला जास्त काम करून दमल्यासारखं होत असेल किंवा इतर कामांमुळे साफ सफाईकडे दुर्लक्ष होत असेल तर आज आम्ही तुम्हाला साफसफाईसाठी आवश्यक असलेल्या काही टिप्स सांगणार आहोत.

दिवाळीचा सण  एका आठवड्यावर येऊन ठेपला आहे. कोरोनामुळे बाहेर, नातेवाईकांकडे येणं जाणं नसलं तरी घरच्याघरी मात्र सगळेजण आनंदाने दिवाळी साजरी करतील. दिवाळी म्हटलं  की घराघरातील गृहिणींना आवराआवर आणि साफ सफाईचं टेंशन येतं. पण काळजी करण्याचं काही कारण नाही. तुम्हाला जास्त काम करून दमल्यासारखं होत असेल किंवा इतर कामांमुळे साफ सफाईकडे दुर्लक्ष होत असेल तर आज आम्ही तुम्हाला साफसफाईसाठी आवश्यक असलेल्या काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्सचा वापर करून तुम्ही आपलं घर चकचकीत शकता. 

सगळे घर एकत्र  स्वच्छ करायचं ठरवलं, तर तुमचा वेळ आणि प्रयत्न दोन्ही वाया जाईल. तुमचे काम आणि प्रयत्न यांचा प्राधान्यक्रम ठरवा. तुमचा वेळ आधी  लादी, भांडी यांच्या साफसफाईत वाटून घ्या. तांबा, पितळाची भांडी घासायला खूप वेळ लागतो. कारण काळपटपणा निघता निघत  नाही. त्यासाठी तुम्ही लिंबाच्या सालीचा किंवा चणाडाळीचा  वापर करून तांबा आणि पितळेची भांडी स्वच्छ करू शकता. त्यामुळे कमी वेळात भांडी स्वच्छ होण्यास मदत होईल. 

घराची साफसफाईची   करताना पंख्यांची साफसफाई करणं कठीण होतं. पंख्याची साफसफाई करताना तुम्ही जुन्या उशीच्या कव्हरचा वापर करू शकता. सुर्चीवर उभं राहून दाबून पंख्यांच्या पात्यावरील धूळ काढून घ्या. विशेष म्हणजे खर्चीवर चढून पंखा साफ करताना  घरातील कोणालाही खुर्ची पकडायला सांगा किंवा लक्ष ठेवण्यास सांगा. कारण अनेकदा साफसफाईत लक्ष असेल तर तोल जाऊन पडण्याची शक्यता असते म्हणून आधीच सावधगिरी बाळगा. 

बाथरूममध्ये टाईल्सची साफसफाई करणे सोपे आहे, पण भिंतीवरील डाग काढणं कठीण आहे.  त्यासाठी आपण बेकिंग सोड्याच्या साहाय्याने टाईल्स स्वच्छ करू शकता.  गरम पाणी किंवा कोलगेटचा वापर करून ब्रशने तुम्ही टाईल्स स्वच्छ केल्या लवकरात लवकर स्वच्छ होतील. पैशांच्या बाबतीत 'या' गोष्टी लक्षात ठेवाल; तर कठीण प्रसंगात नक्की होईल फायदा

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील अनावश्यक गोष्टी काढून टाका. नको असलेल्या वस्तू देऊन टाका आणि घरातला पसारा आवरा. नव्या उत्पादनांच्या मदतीने नेहमीच्या फडक्याला किंवा मॉपला सुट्टी देता येईल. स्प्रे मॉपचा वापर करून लादी चकचकीत स्वच्छ करता येईल. नव्या प्रकारचे स्प्रे मॉप्स हातात सहज धरता येण्यासारखे असल्यामुळे वाकून पूसण्याची काही गरज नाही. 'या' चुकांमुळे घराघरांत शौचालयाच्या माध्यमातून आजार पसरतात; वेळीच सावध व्हा

टॅग्स :DiwaliदिवाळीIndian Festivalsभारतीय सण