'या' चुकांमुळे घराघरांत शौचालयाच्या माध्यमातून आजार पसरतात; वेळीच सावध व्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 07:46 PM2020-08-17T19:46:35+5:302020-08-17T20:01:47+5:30

आजार पसरू नये यासाठी आम्ही कोणत्या चूका करणं टाळायला हवं याबाबत सांगणार आहोत. 

Bathroom hygiene mistakes you need to stop making immediately | 'या' चुकांमुळे घराघरांत शौचालयाच्या माध्यमातून आजार पसरतात; वेळीच सावध व्हा

'या' चुकांमुळे घराघरांत शौचालयाच्या माध्यमातून आजार पसरतात; वेळीच सावध व्हा

googlenewsNext

कोरोनाच्या माहामारीनं सगळ्यांनाच स्वच्छतेचं महत्व पटवून दिलं आहे.  कोरोनाची लागण होण्यापासून बचाव करण्यासाठी घर आणि  आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वच्छतागृहांमध्ये व्यवस्थित साफ सफाई केली गेली नाही तर तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागू शकते. त्यामुळे संक्रमण पसरण्याचा धोका जास्त असतो. आजार पसरू नये यासाठी आम्ही कोणत्या चूका करणं टाळायला हवं याबाबत सांगणार आहोत. 

टॉयलेट सीट बंद न करणं

अनेकजण वापरानंतर टॉयलेटसीटचं झाकण उघडंच ठेवतात. अनेक रिसर्चमधून दिसून आलं आहे की, जर तुम्ही टॉयलेट सीट उघडी ठेवत असाल तर हवेतून पसरणारे बॅक्टेरिया आणि व्हायरस बाऊलमधून बाहेर येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आजारांची लागण होऊ शकते. 

ब्रश चुकीच्या ठिकाणी ठेवणं

अनेकदा टॉयलेट फ्लशमुळे लहान लहान व्हायरसचे आणि बॅक्टेरियांचे कण अन्य वस्तूंप्रमाणेच ब्रशला ही संक्रमित करू शकतात. म्हणून साफ सफाई करून झाल्यानंतर ब्रश धुवून व्यवस्थित जागी ठेवा. ब्रश पॉटपासून जवळपास ४ फुट लांब ठेवा. 

चपलेचा वापर

शौचास जाताना नेहमी चप्पल वापरणं गरजेचं आहे. तुम्ही चप्पल वापरत नसाल तर शौचास जाऊन आल्यानंतर पाय आणि हात स्वच्छ धुवा. अनेकजण बाथरूम स्वच्छ करण्यासाठी केमिकल्सचा वापर करतात केमिकल्सचा वापर केल्यामुळे अस्थमा, शिंका येणं, एलर्जी होणं. गर्भवती महिलांनाही त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर करू नका. 

टॉवेलची स्वच्छता

नियमित वापरात असलेल्या कपड्यांच्या  तुलनेत टॉवेल खूप कमी वेळा धुतला जातो. पण अस्वच्छ आणि संक्रमित टॉवेल आजार पसरण्याचे कारण ठरू शकतो. म्हणून रोजच्या रोज टॉवेल धुवा. अनेकदा ओला टॉवेल बाथरूमध्ये वाळत घातल्यानं लहान लहान मायक्रोऑर्गेनिझ्मस निर्माण होतात. त्यामुळे आजार पसरण्याची शक्यता असते. 

हे पण वाचा-

..... तर २०२१ च्या शेवटापर्यंत कोरोनाची माहामारी पूर्ण नष्ट होणार; तज्ज्ञांचा दावा

युद्ध जिंकणार! शरीरात कोरोना विषाणूंची वाढ होण्यापासून रोखणार 'हे' नवीन औषध, तज्ज्ञांचा दावा

शेवटच्या टप्प्यात पोहोचली चीनी कंपनीची कोरोना लस; 'या' देशाला लसीचे डोस पुरवणार

Web Title: Bathroom hygiene mistakes you need to stop making immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.