Bhai Dooj 2020 : Bhaubeej 2020 gifts ideas for your brother | Bhaubeej 2020: यंदाच्या भाऊबीजेला कमीत कमी खर्चात आपल्या लाडक्या भावासाठी घ्या ‘हे’ खास गिफ्ट्स

Bhaubeej 2020: यंदाच्या भाऊबीजेला कमीत कमी खर्चात आपल्या लाडक्या भावासाठी घ्या ‘हे’ खास गिफ्ट्स

(image Credit- Quora)

भाऊबीज हा भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा महाराष्ट्रीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो. बहीण-भावाच्या नात्यातलं प्रेम वाढवणारा हा सण. या दिवशी प्रत्येक बहिणीला आपल्या भावाला भेटण्याची ओढ असते.  सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला लाडका भावड्या किंवा ताई आपल्याला काय  गिफ्ट देणार याचं आकर्षण सगळ्यांनाच असतं. दिवाळी सुरू होण्याच्या आधीच भावाला किंवा बहिणीला काय द्यायचं याचं प्लॅनिंग डोक्यात सुरू असतं.  तुम्हीसुद्धा असाच विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला भावाला काय गिफ्ट देता येईल याबाबत सांगणार आहोत. 

घड्याळ

भाऊबीजेनिमित्त तुम्ही आपल्या भावाला त्याच्या आवडत्या ब्रँडेड कंपनीचं घड्याळ देऊ शकता. विशेष म्हणजे त्याच्या आवडीच्या रंगाचं घड्याळ गिफ्ट म्हणून दिल्यास त्याला आणखी आनंद होईल. सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर घड्याळावर मोठा डिस्काऊंड देण्यात येत आहे. त्यामुळे ऑनलाईन स्वस्तात चांगलं घड्याळ तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला ऑनलाईन घ्यायचं नसल तर तुम्ही बाजारातूनही कमीत कमी पैशात आकर्षक डिजाईनचे घड्याळ आणू शकता. 

मोबाईल

सध्या सण उत्सवांमुळे मोबाईल फोन्सवर सुट मिळत आहे. अॅमेझॉन, फ्लिपकार्डवर मोबाईल फोनवर मोठी सुट मिळत आहे. त्यामुळे तुम्ही अगदी कमी पैशात चांगला स्मार्टफोन खरेदी करून तो आपल्या भावाला गिफ्ट करू शकता. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला अनेक व्हरिएंट उपलब्ध आहेत. फोटो काढण्याची आवड असेल तर अडवांस कॅमेराचा फोन घेऊ शकता. 

शर्ट्स, जॅकेट

तुमच्या भावाला नवनवीन कपडे घालण्याची आवड असेल तर तुम्ही त्याला ब्रँडेड जॅकेट किंवा शर्ट्सचा सेट  गिफ्ट करू शकता. तुम्ही जर आपल्या भावाच्या आवडत्या रंगाचा शर्ट किंवा कुर्ता घेतला तर  तर ते त्याला अधिक आवडेल आणि हे गिफ्ट त्याच्यासाठी अविस्मरणीय ठरेल.

Diwali 2020 : दिवाळीसाठी मिठाई, पेढे घेताना भेसळयुक्त मावा कसा ओळखाल? 'या' ७ ट्रिक्स सोपं करतील तुमचं काम

वॉलेट

भाऊबीजेचं गिफ्ट म्हणून आपल्या भावाला वॉलेट देऊ शकता. वॉलेटमध्ये देखील खूप  प्रकार पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्ही आपल्या भावाच्या आवडत्या रंगाचं वॉलेट घेऊत ते त्याला गिफ्ट करू शकता. या वॉलेटमध्ये तुम्ही भावाला खर्चासाठी पॉकेटमनी दिले तर ते अतिउत्तम ठरेल आणि तुमचा भाऊ तुमच्यावर आणखी खूश होईल. साधारणपणे ३५० पासून  ८०० रुपयांपर्यंत  चांगलं वॉलेट घेऊ शकता. याशिवाय तुम्ही चॉकलेट्स, गॉगल्स, सॅण्डल, ईअरफोन्स असे वेगवेगळे गिफ्ट्स आपल्या भावाला देऊ शकता. 

Diwali Rangoli 2020: रांगोळ्यांच्या या खास डिझाइन्स दिवाळीच्या उत्सवामध्ये भरतील वेगळे रंग!

Web Title: Bhai Dooj 2020 : Bhaubeej 2020 gifts ideas for your brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.