जगभरातील शाळांचे 7 सर्वात धोकादायक रस्ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 13:26 IST2018-04-03T13:25:11+5:302018-04-03T13:26:46+5:30

या अतिशय कठीण रस्त्यांवरुनही ही मुलं रोज शाळेत जातात. 

7 world's most dangerous school roads | जगभरातील शाळांचे 7 सर्वात धोकादायक रस्ते

जगभरातील शाळांचे 7 सर्वात धोकादायक रस्ते

शहरी भागात शाळेत जाण्याचा रस्ता किती सहज आणि सोपा होता ना...? पण आज आम्ही तुम्हाला शाळेंचे असे काही जगभरातील खतरनाक रस्ते दाखणार आहोत, ज्याचा विचारही तुम्ही करु शकत नाहीत. या अतिशय कठीण रस्त्यांवरुनही ही मुलं रोज शाळेत जातात. 

1) तुटलेला पूल, चिहेरंग नदी, लेबक, इंडोनेशिया

(Imege Credit:Daily Mail)

चीलंगकप गावातील ही मुलं रोज या तुटलेल्या पुलावरुन शाळेत जातात. या तुटलेल्या पुलाचा स्टीलचा रॉड पकडून त्यांना हा रस्ता क्रॉस करावा लागतो. आपला जीव मुठीत घेऊन रोज ही मुलं शाळेत जातात.

2) डोंगरातील एका फूटाच्या रस्त्यावरुन पाच तासांचा रस्ता, चीन

(Image Credit : tranquilmonkey)

या परीसरातील शाळा डोंगरात इतक्या अडचणीच्या ठिकाणी आहे की, या मुलांना तब्बल पाच तासांचा खडतर प्रवास करुन जावं लागतं. धक्कादायक बाब म्हणजे या डोंगरातील हा खडतर मार्ग केवळ एक फूटाचा आहे. जराही तोल गेला तर मोठा अनर्थ होऊ शकतो.

3) टायरवरुन नदी ओलांडणारी शाळकरी मुले, फिलीपिन्स

(Image Credit: zikoko)

येथील एका गावातील शाळकरी विद्यार्थी नदी क्रॉस करण्यासाठी टायरवर बसून रोज शाळेत जातात. 

4) झाडांच्या मुळांचा रस्ता, भारत

(Image Credit: boredpanda)

हा फोटो भारतातीलच एका गावातील आहे. या गावातील मुलांना झाडांच्या मुळांपासून तयार झालेल्या रस्त्यांवरुन शाळेत जावं लागतं. 

5) 30 फूट वर तुटलेल्या पुलांवरुन, इंडोनेशिया

(Image Credit: pinimg)

या शाळकरी मुलांना एका नदीवरील 30 फूट उंचावर तुटलेल्या पुलावरुन जावं लागतं. 

6) बर्फाने झाकलेल्या तुटल्या पुलावरुन..., चीन

(Image Credit : telegraph)

चीनमधील एका भागात मुलांना पूर्णपणे बर्फाने झाकल्या गेलेल्या पुलावरुन जावं लागतं. 

7) डोंगरातून रस्ता काढत जाणारी मुलं, चीन

(Image Credit: hi-likes)

या मुलांना रोज शाळेत डोंगरातून रस्ता नसलेल्या जागेतून जावं लागतं.

Web Title: 7 world's most dangerous school roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.