लातुरात किरकोळ वादातून युवकाची भरचौकामध्ये हत्या; दोन आरोपींना पोलिस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 20:10 IST2026-02-03T20:10:15+5:302026-02-03T20:10:42+5:30

जुन्या वादाचे निमित्त साधत आरोपींनी शिवीगाळ करण्यास सुरुवात करत अचानक केला चाकू हल्ला

Youth murdered in Latur over minor dispute; Two accused remanded in police custody | लातुरात किरकोळ वादातून युवकाची भरचौकामध्ये हत्या; दोन आरोपींना पोलिस कोठडी

लातुरात किरकोळ वादातून युवकाची भरचौकामध्ये हत्या; दोन आरोपींना पोलिस कोठडी

लातूर : जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी दोघा तरुणांनी एका २१ वर्षीय युवकाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. ही घटना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैकात रविवारी रात्री उशिरा घडली. प्रज्वल उर्फ गोट्या संजय मस्के असे मयत युवकाचे नाव आहे. या हल्ल्यात आतिश मस्के थोडक्यात बचावला. घटनेतील आराेपींना साेमवारी पहाटे अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली.

पाेलिसांनी सांगितले, १ फेब्रुवारी राेजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात भर रस्त्यावर थरारक घटना घडली. फिर्यादी आतिश बाबासाहेब मस्के (वय २३, रा. बौद्धनगर, लातूर) आणि त्यांचा चुलत भाऊ प्रज्वल हे जात असताना आरोपी गणेश गायकवाड आणि भीमा सूर्यवंशी (दोघे रा. आनंद नगर, लातूर) यांनी त्यांना वाटेतच अडवले. जुन्या वादाचे निमित्त साधत आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात गणेश गायकवाड याने प्रज्वल याच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. या गंभीर हल्ल्यात प्रज्वल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. याचवेळी आरोपी भीमा सूर्यवंशी याने फिर्यादी आतिश मस्के यांच्यावरही कोयत्याने वार केला. मात्र, आतिश याने प्रसंगावधान राखत वार चुकवल्याने त्याचे प्राण वाचले. या घटनेची माहिती मिळताच विवेकानंद चौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली. घटनेनंतर दाेन्ही आराेपी पसार झाले. सपोनि. खोडेवाड यांच्या पथकाने कातपूर परिसरातून साेमवारी पहाटे दोन्ही 
आरोपींच्या मुसक्या आवळल्या. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुरनं. ६७/२०२६ कलम १०३(१), १०९, ३५२, ३५१(२)(३), ३(५) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाेन्ही आराेपींना लातूर न्यायालयात केले हजर
या खुनाच्या घटनेत अटक केलेल्या दाेन्ही आरोपींना लातूर न्यायालयात दुपारी हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
- संताेष पाटील, पाेलिस निरीक्षक, लातूर

Web Title : लातूर: मामूली विवाद में युवक की हत्या; आरोपी पुलिस हिरासत में।

Web Summary : लातूर में पुराने विवाद के चलते 21 वर्षीय युवक की चाकू मारकर हत्या कर दी गई। दो संदिग्धों को गिरफ्तार कर पुलिस हिरासत में भेज दिया गया है। घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक के पास हुई। पुलिस मामले की जांच कर रही है।

Web Title : Latur: Youth murdered in public over dispute; accused in custody.

Web Summary : A 21-year-old was fatally stabbed in Latur due to an old feud. Two suspects are in police custody after arrest. The incident occurred near Dr. Babasaheb Ambedkar Chowk. Police are investigating the case.