लातुरात तरुणाचा गळा चिरुन खून

By राजकुमार जोंधळे | Updated: October 10, 2024 04:39 IST2024-10-10T04:38:52+5:302024-10-10T04:39:25+5:30

गांधी चाैक पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु हाेती.

young man was killed by slitting his throat in latur | लातुरात तरुणाचा गळा चिरुन खून

लातुरात तरुणाचा गळा चिरुन खून

राजकुमार जाेंधळे / लातूर : शहरातील गंजगाेलाई परिसरात एका तरुणाचा गळा चिरुन खून करण्यात आल्याची घटना बुधवारी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. २४ तास उलटत नाहीत ताेपर्यंत खुनाची दुसरी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु हाेती.

पाेलिसांनी सांगितले, लातुरातील गंजगाेलाई परिसरात क्षुल्लक कारणावरुन बाचाबाची झाली. यामध्ये एकाने दुसऱ्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला पैगंबर हाजीमलंग सय्यद (वय २५ रा. बाभळगाव ह.मु. अंजलीनगर, लातूर) हा धावत-पळत लाेखंड गल्लीच्या दिशेने आला. यावेळी माेठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने ताे जमिनीवर काेसळला. याची माहिती स्थानिक नागरिकांनी पाेलिसांना दिली. त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पाेलिसांनी सांगितले.

क्षुल्लक कारण; मानेवरच हल्ला...

पैगंबर हजीमलंग सय्यद याच्या गळ्यावर, मानेवर मित्रानेच हल्ला केल्याची चर्चा आहे. दरम्यान, क्षुल्लक कारणातून झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे पाेलिसांनी सांगितले. पोलिसांकडून आराेपीचा शाेध सुरु आहे.

Web Title: young man was killed by slitting his throat in latur