निलंग्यात दूध डेअरीच्या खिडकीला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 23:47 IST2022-07-09T23:44:31+5:302022-07-09T23:47:11+5:30

पाेलिसांनी सांगितले, धानाेरा (ता. निलंगा) येथील रहिवासी असलेले दिलीप थाेरमाेटे हे निलंगा येथील एका खासगी वाहनावर चालक म्हणून गत १५ वर्षांपासून काम करत हाेते.

Young man commits suicide by hanging himself at a milk dairy window in Nilanga | निलंग्यात दूध डेअरीच्या खिडकीला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

निलंग्यात दूध डेअरीच्या खिडकीला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

निलंगा (जि. लातूर) : दूध डेअरीच्या जुन्या इमारतीत खिडकीला दाेरी बांधून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना निलंगा शहरातील लातूर-बिदर राेडवर घडली. दिलीप शेषराव थोरमोटे (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पाेलिसांनी सांगितले, धानाेरा (ता. निलंगा) येथील रहिवासी असलेले दिलीप थाेरमाेटे हे निलंगा येथील एका खासगी वाहनावर चालक म्हणून गत १५ वर्षांपासून काम करत हाेते. दरम्यान, शनिवारी सकाळी १० वाजता लातूर-बिदर महामार्गावर असलेल्या शासकीय दूध डेअरीच्या जुन्या इमारतीत खिडकीला कापडी दाेरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यामागचे कारण मात्र अद्याप समाेर आले नाही. घटनास्थळी पाेलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर धानाेरा येथे शनिवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन भाऊ असा परिवार आहे. याबाबत निलंगा पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. तपास पोलीस हवालदार सुधीर शिंदे करत आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Young man commits suicide by hanging himself at a milk dairy window in Nilanga