अवैध धंद्यांविरोधात महिलांचा रेणापूर ठाण्यावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 16:33 IST2018-09-18T16:31:12+5:302018-09-18T16:33:28+5:30

कामखेडा येथे दारूबंदी करावी, मटका, जुगार व अन्य अवैध बंद करुन संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी गावातील महिलांसह नागरिकांनी आज सकाळी रेणापूर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता़

women Morcha on renapur police station against illegal activities | अवैध धंद्यांविरोधात महिलांचा रेणापूर ठाण्यावर मोर्चा

अवैध धंद्यांविरोधात महिलांचा रेणापूर ठाण्यावर मोर्चा

रेणापूर (जि़ लातूर) : तालुक्यातील कामखेडा येथे दारूबंदी करावी, मटका, जुगार व अन्य अवैध बंद करुन संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी गावातील महिलांसह नागरिकांनी आज सकाळी रेणापूर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता़

गेल्या काही महिन्यांपासून कामखेडा व परिसरात अवैध दारूविक्री सुरु आहे़ तसेच मटका, जुगारही वाढला आहे़ त्यामुळे गावात तंटे वाढले आहेत़ गावातील  महिलांसह नागरिकांना त्रास होत आहे़ हे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत, अशी मागणी गावकऱ्यांनी गेल्या महिन्यात तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली होती़ परंतु, अद्यापही कार्यवाही झाली नसल्याने संतप्त झालेल्या महिला व नागरिकांनी मंगळवारी रेणापूर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला़ अर्धा तास पोलीस ठाण्यात ठिय्या मांडत जोपर्यंत अवैध धंदे बंद होत नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असा पावित्रा घेतला होता़ तेव्हा पोलीस निरीक्षक गोरख दिवे  यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले़ त्यानंतर आंदोलक ठाण्याच्या बाहेर पडले़
 

Web Title: women Morcha on renapur police station against illegal activities