शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

कव्हा येथील तलावात दोघांचा बुडून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 11:32 PM

शहरालगत असलेल्या कव्हा रोडवरील तलावात दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

लातूर : शहरालगत असलेल्या कव्हा रोडवरील तलावात दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेत पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले, लातूर शहरानजिक असलेल्या कव्हा रोडवरील तलावात खंडोबा गल्लीत राहणारे तिघे मित्र पोहण्यासाठी मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गेले. तिघांपैकी सोहेल जमील पठाण (१४), बळीराम बाबू लोखंडे (१८) हे तलावातील पाण्यात पोहण्यासाठी उतरले. दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला. यावेळी तलावाच्या काठावर थांबलेल्या तिसऱ्या मित्राने या दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नाही. त्यानंतर तो घाबरून घटनास्थळावरून घरी परतला. सोहेल आणि बळीराम हे दोघे रात्री उशिरापर्यंत घरी आले नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्या मित्राकडे चौकशी केली असता, घडलेल्या घटनेबाबत त्याने माहिती दिली. त्यानंतर बुधवारी सकाळी लातूर ग्रामीण पोलीस व गावकºयांनी या दोघांचे मृतदेह तलावाबाहेर काढले. याबाबत मोहसीन कासीमखान पठाण (२७, रा. खंडोबा गल्ली, लातूर) यांच्या माहितीवरून लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आर.के. निलंगेकर हे करीत आहेत.