गाेड जेवणावरून निघालेली दुचाकी ट्राॅलीवर धडकली, तरुण ठार

By राजकुमार जोंधळे | Updated: October 14, 2023 23:40 IST2023-10-14T23:39:56+5:302023-10-14T23:40:14+5:30

किल्लारी-उमरगा मार्गावरील घटना

Two-wheeler leaving food stall rammed into trolley, youth killed | गाेड जेवणावरून निघालेली दुचाकी ट्राॅलीवर धडकली, तरुण ठार

गाेड जेवणावरून निघालेली दुचाकी ट्राॅलीवर धडकली, तरुण ठार

राजकुमार जाेंधळे, किल्लारी (जि. लातूर) : भावाच्या गाेड जेवण कार्यक्रमावरून परतणारी दुचाकी महामार्गालगत थांबलेल्या ट्राॅलीवर जाेराने धडकल्याची घटना किल्लारी-उमरगा महामार्गावरील सिरसल पाटीनजीक शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात एक ३२ वर्षीय तरुण ठार झाला आहे. याबाबत किल्लारी पाेलिस ठाण्यात शनिवारी घटनेची नाेंद करण्यात आली आहे. सुरेश बाळासाहेब पाटील असे मयत तरुणाचे नाव आहे.

पाेलिसांनी सांगितले, सुरेश बाळासाहेब पाटील हा आपल्या भावाच्या गाेड जेवणाच्या कार्यक्रमाला गेला हाेता. दरम्यान, परत येण्यासाठी ताे मित्राच्या दुचाकीवरून (एम.एच. २४ बी.सी. ७०५२) घराकडे निघाला हाेता. लामजना-किल्लारी-उमरगा महामार्गावरील सिरसल पाटीनजीक ट्राॅली उभारली हाेती. या ट्राॅलीला भरधाव दुचाकी धडकली. या अपघातात सुरेश पाटील हा ठार झाला आहे. घटनास्थळी किल्लारी पाेलिस ठाण्याच्या पाेलिसांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत किल्लारी पाेलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरुन घटनेची नाेंद करण्यात आली आहे. तपास पाेलिस अंमलदार मरडे, आबा इंगळे करत आहेत.

Web Title: Two-wheeler leaving food stall rammed into trolley, youth killed