दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी हातातील माेबाइल पळविला; अंधाराचा फायदा घेऊन झाले पसार

By राजकुमार जोंधळे | Updated: August 10, 2022 18:03 IST2022-08-10T18:01:49+5:302022-08-10T18:03:05+5:30

रात्री पावणेदहाच्या सुमारास एका रुग्णालयासमाेरुन पायी जात असताना घडली घटना

Two people who came on a bike ran away with the mobile phone in hand; The spread took advantage of the darkness | दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी हातातील माेबाइल पळविला; अंधाराचा फायदा घेऊन झाले पसार

दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी हातातील माेबाइल पळविला; अंधाराचा फायदा घेऊन झाले पसार

लातूर : शहरातील जुना औसा राेड परिसरात दुचाकीवरुन आलेल्या दाेघांनी एका कर्मचाऱ्याच्या हाताील माेबाइल हिसकावत पळ काढल्याची घटना घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. 

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी हेमंत माेहन कवडे (रा. महसूल काॅलनी, लातूर) हे जेवण केल्यानंतर रात्री पावणेदहाच्या सुमारास एका रुग्णालयासमाेरुन पायी निघाले हाेते. दरम्यान, पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या दाेघा तरुणांनी फिर्यादीच्या हातातील माेबाइल हिसकावत पळ काढला. त्यांना आरडाओरडा केला मात्र ते अज्ञात दाेघे पसार झाले. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा नाेंद केला आहे.

Web Title: Two people who came on a bike ran away with the mobile phone in hand; The spread took advantage of the darkness