शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

अहमदपुरातील १२७ गावांचा कारभार दोन मंडल अधिकाऱ्यांवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदपूर : तालुक्यातील १२७ गावांसाठी सहा मंडल असून, या गावांचा कारभार केवळ दोन मंडल अधिकारीऱ्यांवर आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदपूर : तालुक्यातील १२७ गावांसाठी सहा मंडल असून, या गावांचा कारभार केवळ दोन मंडल अधिकारीऱ्यांवर आहे. तालुक्यातील ४ पदे रिक्त असून, ऐन पेरणीच्या दिवसात शिव रस्ते चौकशी, निराधारांच्या अनुदानाचा अहवाल यासोबतच अनेक कामे प्रलंबित राहत असल्याने शेतकऱ्यांसह विविध योजनेच्या लाभार्थ्यांना अडचणींना सामाेरे जावे लागत आहे.

अहमदपूर तालुक्यात सहा मंडल असून, १२७ महसुली गावे व ५० वाड्या-तांडे आहेत. त्यात अहमदपूर, शिरूर, हाडोळती, किनगाव, खंडाळी, अंधोरीचा समावेश आहे. प्रत्येक मंडलाला स्वतंत्र मंडल अधिकारी असून, एका अधिकाऱ्याकडे २० ते २५ गावांचा कार्यभार आहे. प्रत्येक मंडल अधिकाऱ्यांना शिव रस्ताचे पंचनामे करणे, चौकशी अहवाल तयार करणे, संगायो, इंगायो, वृद्धापकाळ अनुदान योजनांच्या प्रस्तावाची चौकशी करणे, विहीर अधिग्रहण, पंचनामे करणे, कोरोनाविषयक माहिती जमा करणे, फेरफार चौकशी मंजूर करणे अशी विविध प्रकारचे ८१ कामे करावी लागतात. त्यात अपुऱ्या मनुष्यबळामुळे त्यांना पूर्णवेळ काम करावे लागते. मात्र, तालुक्यातील चार मंडल अधिकाऱ्यांपैकी एक मंडल अधिकारी वैयक्तिक दीर्घ रजेवर असून, एक मंडल अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे दोन मंडल अधिकारी सध्या कार्यरत असून, त्यातील मधुकर क्षीरसागर यांच्याकडे अहमदपूर, खंडाळी, हाडोळतीचा कार्यभार असून, सुनीता ताटे यांच्याकडे किनगाव, अंधोरी, शिरूर ताजबंदचा पदभार आहे. त्यामुळे या मंडल अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार असल्यामुळे अनेक लोकोपयोगी कामांमध्ये अडचण येत आहेत. अधिकारी स्वाक्षरी करत नाहीत, उपस्थित राहत नाहीत अशाप्रकारच्या तक्रारी तहसील कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत. याबाबत चौकशी केली असता, ६ मंडलांचा प्रभार दोनच मंडल अधिकाऱ्यांवर असल्याने समस्या येत असून, याबाबत वरिष्ठांना अहवाल पाठवला असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.

शेकडो प्रकरणे प्रलंबित...

१२७ गावांचा कारभार दोनच मंडल अधिकाऱ्यांवर असल्याने अहमदपूर तालुक्यातील शिव रस्त्याचे ६० अर्ज, फेरफारचे ३०, निराधार योजनेचे २५० तर विहीर अधिग्रहणाचे १० प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह संबंधित गावांमधील ग्रामस्थांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

रिक्त पदांचा प्रस्ताव जिल्हास्तरावर..

मंडल अधिकारी पदाच्या रिक्त जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. तालुक्‍यातील सहा मंडलांसाठी केवळ दोनच मंडल अधिकारी असून, चार जागा रिक्त आहेत. याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.