अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघा मित्रांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 11:40 AM2022-04-07T11:40:11+5:302022-04-07T11:40:30+5:30

बुधवारी रात्री निलंग्याहून गुंजरग्याकडे दुचाकीवरुन निघाले असता रस्त्यात झाला अपघात

Two friends died on the spot in an unidentified vehicle collision | अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघा मित्रांचा जागीच मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघा मित्रांचा जागीच मृत्यू

Next

निलंगा (जि. लातूर) : निलंग्याहून गुंजरग्याकडे दुचाकीवरुन निघालेल्या मित्रांना अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ११.३० वा. च्या सुमारास घडली.

बालाजी राम शिंदे (२७) व सूर्यकांत वाघंबर शिंदे (३८, दोघेही रा. गुंजरगा, ता. निलंगा) असे मयत मित्रांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले, तालुक्यातील गुंजरगा येथील बालाजी शिंदे व सूर्यकांत शिंदे हे दोघे बुधवारी रात्री निलंग्याहून गुंजरग्याकडे दुचाकीवरुन निघाले होते. दरम्यान, ते ज्ञानोबा बोधले यांच्या शेताजवळ पोहोचले असता अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात दोघेही जागीच ठार झाले.

ही माहिती मिळताच निलंग्याचे पोलीस निरीक्षक बी.आर. शेजाळ व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी निलंगा पोलिसांत अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत बालाजी शिंदे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली तर सूर्यकांत शिंदे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

Web Title: Two friends died on the spot in an unidentified vehicle collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.