गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 21:23 IST2025-06-21T21:23:14+5:302025-06-21T21:23:41+5:30

गोदाम फोडून एलईडी टीव्ही चोरणाऱ्या दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

Two arrested for breaking into a warehouse; valuables worth Rs 2.5 lakh seized, action taken by Latur Local Crime Branch | गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

गोदाम फोडून एलईडी टीव्ही चोरणाऱ्या दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल २ लाख ४० हजारांच्या सहा टीव्ही असा मुद्देमाव जप्त केला आहे. इलेक्ट्रॉनिक साहित्याचे गोदाम फोडून ४३ इंची सहा एलईडी टीव्ही पळविल्याची घटना घडली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात १९ जूनरोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे आदेश पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले. 

अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाने गुन्ह्याच्या समांतर तपास सुरु केला. इलेक्ट्रॉनिक साहित्याचे गोदाम फोडून सहा एलईडी टीव्हीसह दोन सराईत गुन्हेगार लातूर-बार्शी मार्गावरील बुलालगत एका भंगार दुकानात थांबले आहेत. अशी माहिती खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळ गाठून दोघा संशयीतांना ताब्यात घेतले. 

त्यांच्याकडील टीव्हीची चौकशी केली असता, गोदामाचे शटर उचकटून सहा एलईडी चोरल्याचे कबूल केले. यावेळी जलील बशीर शेख (वय ३८, रा. म्हाडा कॉलनी, बाभळगाव रोड, लातूर) आणि शंकर शिवाजी मोरे (वय ३४, रा. लक्ष्मी कॉलनी, पाखर सांगवी, लातूर) असे दोघांनी आपली नावे सांगितली.

ही कामगिरी लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोउपनि. संजय भोसले, संजय कांबळे, योगेश गायकवाड, राजेश कंचे, तुळशिराम बरुरे, व्यंकटेश निटुरे यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Two arrested for breaking into a warehouse; valuables worth Rs 2.5 lakh seized, action taken by Latur Local Crime Branch