शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

सत्य आणि लोकांचा विश्वास हीच पत्रकारितेची खरी शक्ती: राजेंद्र दर्डा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 10:05 IST

सत्यासाठी उभे राहण्याचा, मूल्याधिष्ठित पत्रकारितेचा आणि पारदर्शी आरसा बनण्याचा संकल्प करून लोकांचा विश्वास कायम राखला पाहिजे. तीच पत्रकारितेची खरी शक्ती आहे. समाजाला केवळ माहिती नको, तर विश्वासार्ह, पडताळलेली आणि जबाबदार बातमी हवी आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी शनिवारी येथे केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कउदगीर (जि. लातूर) : सत्यासाठी उभे राहण्याचा, मूल्याधिष्ठित पत्रकारितेचा आणि पारदर्शी आरसा बनण्याचा संकल्प करून लोकांचा विश्वास कायम राखला पाहिजे. तीच पत्रकारितेची खरी शक्ती आहे. समाजाला केवळ माहिती नको, तर विश्वासार्ह, पडताळलेली आणि जबाबदार बातमी हवी आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी शनिवारी येथे केले. 

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या ४४व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री आ. संजय बनसोडे, परिषदेचे मुख्य संयोजक एस. एम. देशमुख, मिलिंद आष्टीवकर, नगराध्यक्षा स्वाती हुडे  उपस्थित होते. राजेंद्र दर्डा म्हणाले की, पत्रकार म्हणून बातमी वेगाने दिलीच पाहिजे. मात्र, प्राधान्य वेगाला की सत्याला हे लक्षात ठेवले पाहिजे. सोशल मीडिया ही एक मोठी संधी आहे. त्याचवेळी अनेक वेळा ते मोठे आव्हान ठरत आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेचे आपल्यासमोर आव्हान आहे, असे स्पष्ट करीत राजेंद्र दर्डा म्हणाले, सद्य:स्थितीत ए-आय बातमी तयार करणे, डेटा विश्लेषण, फॅक्ट चेकिंग या सगळ्यांमध्ये उपयोगी ठरत आहे. ते साधन आहे मात्र, पर्याय नाही. मानवी संवेदना, नैतिकता आणि सामाजिक जबाबदारीची जागा कोणतेही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही. त्यामुळे तंत्रज्ञानाला स्वीकारून सत्याच्याच मार्गाने पुढे जाण्याची जबाबदारी पत्रकारांची असेल. अ. भा. मराठी पत्रकार परिषदेने मांडलेल्या निवृत्तिवेतन, पत्रकारांच्या आरोग्यविषयक प्रश्नांची दखल शासनाने घ्यावी, असे आवाहनही दर्डा यांनी केले. अनिता येलमट्टे, रसूल पठाण यांनी सूत्रसंचालन केले. मंचावर जिल्हाधिकारी डॉ. भारत भास्टेवाड, पोलिस अधीक्षक अमोल तांबे, प्राचार्य डॉ. सुधीर जगताप, परिषदेचे किरण नाईक, चंद्रशेखर जाधव, हरीश पटणे, शरद पाबळे, प्रा. सुरेश नाईकवाडे उपस्थित होते.

‘लोकमत’ने जोपासली सामाजिक बांधिलकी 

भाषा, गुणवत्ता, आशय, सामाजिक बांधिलकी, तंत्रज्ञान, व्यावसायिक कौशल्य यासोबतच मेहनती एकनिष्ठ सहकाऱ्यांच्या भरवशावरच ‘लोकमत’ने एवढा मोठा पल्ला गाठला असल्याचे सांगत राजेंद्र दर्डा यांनी सामाजिक बांधिलकी, सौहार्द जपल्याची उदाहरणे दिली. प्रारंभी परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख म्हणाले, राज्य सरकारने पत्रकार संरक्षण कायदा मंजूर केला. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन सुलभपणे मिळत नाही. अधिस्वीकृतीचे नियम किचकट आहेत, असे सांगत शासनाचे लक्ष वेधले.

पत्रकारांचे प्रश्न मांडू : शिवेंद्रसिंहराजे भोसले

पत्रकारांनी अधिवेशनात मांडलेल्या प्रश्नांचा पाठपुरावा करू, अशी ग्वाही देत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, पत्रकारितेमुळे सामान्य प्रश्नाला न्याय मिळतो. लातूरमध्ये पत्रकारांच्या आंदोलनामुळे जिल्हा रुग्णालयाच्या उभारणीला गती मिळाली. उदगीर जिल्हा निर्मितीचा प्रश्नही उचलून धरला आहे. शासन त्याबाबत योग्य निर्णय घेईल. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, मुद्रित माध्यमांचे महत्त्व कधीही कमी होणार नाही. लोकांचा वर्तमानपत्रावरील विश्वास अढळ आहे. प्रारंभी माजी मंत्री आ. संजय बनसोडे म्हणाले, पत्रकार भवनासाठी चार कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. आता जिल्हा निर्मितीसाठी पाठपुरावा सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Truth and public trust are journalism's real power: Rajendra Darda

Web Summary : Rajendra Darda emphasized that truth, values, and transparency are vital for journalism. He highlighted the importance of verifying news and using technology responsibly, noting that technology is a tool but can't replace human ethics. Government should address journalists' pension and health issues, he added.
टॅग्स :laturलातूरMaharashtraमहाराष्ट्र