दयानंद विज्ञान महाविद्यालयात माने, तोडकर यांचा सत्कार
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील पर्यवेक्षक प्रा. मिलिंद माने यांना स्वारातीम विद्यापीठाच्या वतीने तर गुरुलिंग तोडकर यांना भौतिकशास्त्र विषयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी. प्रदान केली. या यशाबद्दल प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य डी.टी.जगताप, प्रा. हेमंत वरुडकर, प्रा.व्ही.एस. मांदळे, प्रा. डी.एम.सूर्यवंशी, प्रा. बी.जे.कोमलवार, प्रा. व्ही.ए.कैले, प्रा.आर.एस. गायकवाड, प्रा.एस.एन. सदाफुले, प्रा.एम.बी.पाटील आदींसह प्राध्यापक, कर्मचा-यांनी कौतूक केले आहे.
श्यामनगर येथे पात्र लाभार्थ्यांना अर्जांचे वाटप
लातूर : शहरातील प्रभाग १० मधील श्यामनगर येथे पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेच्या अर्थसाह्य अर्जांचे वाटप करण्यात आले. यावेळी दीपक सुळ, पडीले, अजनीकर, भगत यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जांचे वितरण झाले. याप्रसंगी विजय टाकेकर, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष हकीम शेख, युवक काँग्रेसचे युनूस शेख, अजय मार्डीकर, बालाजी बादाडे, बालाजी जाधव, अनिल सुरनर आदींसह समितीचे सदस्य, लाभार्थ्यांची उपस्थिती होती.
कारागृह परिसरात पक्षांच्या पाण्याची सोयलातूर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व प्रभुराज प्रतिष्ठाण यांच्या सयूंक्त विद्ममाने पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी जिल्हा कारागृहाच्या परिसरात येळण्या बसविण्यात आल्या. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. एस. डी. कंकणवाडी, ॲड. अजय कलशेट्टी, कारागृहाचे अधीक्षक राहुल जटाळे, मधुकर चौधरी, कल्पना भुरे, ॲड. किरण चिंते, ॲड. सारिका वायबसे, ॲड. तृप्ती ईटकरी, ॲड. हर्षदा जोशी, कैलास गरूडकर, गजानन पांचाळ, बापू बेस्के यांची उपस्थिती होती.
लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कुल मध्ये शहीद दिवस
लातूर : शहरातील लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये शहीद दिवस ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी श्रीकृष्ण लाटे, शाळेच्या प्राचार्या दुर्गा भताने, शाळेचे समन्वयक रौफ शेख यांच्या हस्ते शहीद भगतिसंग, राजगुरु, सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. प्राचार्या दुर्गा भतनो यांनी शहीदांच्या कार्याविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका नम्रता डांगे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.