निलंगा-औराद मार्गावर दुचाकींच्या अपघातात व्यापारी ठार तर एक जण गंभीर

By राजकुमार जोंधळे | Updated: December 6, 2023 05:21 IST2023-12-06T05:20:25+5:302023-12-06T05:21:06+5:30

मंगळवारी रात्रीची घटना, औराद शहाजानी येथील बांधकाम साहित्याचे व्यापारी बस्वराज रघुनाथ कत्ते हे दुचाकीवरून निलंगा येथे गेले हाेते

Trader killed in two-wheeler accident on Nilanga-Aurad road; A serious one | निलंगा-औराद मार्गावर दुचाकींच्या अपघातात व्यापारी ठार तर एक जण गंभीर

निलंगा-औराद मार्गावर दुचाकींच्या अपघातात व्यापारी ठार तर एक जण गंभीर

 

औराद शहाजानी (जि. लातूर) : दाेन दुचकींच्या अपघातात निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील व्यापारी ठार झाला असून, अन्य एक गंभीर जखमी झाल्याची घटना लातूर-जहिराबाद महामार्गावरील तगरखेडा पाटी येथे मंगळवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास घडली. बस्वराज रघुनाथ कत्ते (वय ५३), असे अपघातात ठार झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

औराद शहाजानी येथील बांधकाम साहित्याचे व्यापारी बस्वराज रघुनाथ कत्ते हे दुचाकीवरून निलंगा येथे मंगळवारी गेले हाेते. दरम्यान, निलंगा येथून औराद शहाजानीकडे येताना तगरखेडा पाटी येथे दाेन दुचाकींची जाेराची धडक झाली. या अपघातात बसवराज कत्ते हे गंभीर जखमी झाले. त्यांना औराद शहाजानी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता. तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनासाठी मृतदेह निलंगा येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवार, दि.६ डिसेंबर रोजी येथील लिंगायत स्मशानभूमी येथे दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा व भाऊ, असा परिवार आहे.

Web Title: Trader killed in two-wheeler accident on Nilanga-Aurad road; A serious one

टॅग्स :Accidentअपघात