चाकूर (जि. लातूर) : नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील लातूर रोड येथील उड्डाणपुलावर शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाला, तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. उसाने भरलेल्या ट्रॅक्टरवर दुचाकी पाठीमागून धडकली आणि भीषण अपघात झाला. जखमी पत्नीला पोलिसांनी तातडीने उपचारासाठी लातूरला हलविले. याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले, कळवा (जि. ठाणे) येथील रहिवासी चेतन पंचाक्षरी मलकसमुद्र (वय ३६) आणि पत्नी अश्विनी (वय ३०) हे दोघे लातूरहून तळेगावकडे (ता. अहमदपूर) दुचाकीवरून (एम.एच. २४ एम. ७७०९) जात होते.
याचवेळी देवंग्रावाडी येथून उसाने भरलेला ट्रॅक्टर अहमदपूरच्या दिशेने जात होता. दरम्यान, उड्डाणपुलावर भरधाव वेगात असलेल्या दुचाकीने ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, चेतन मलकसमुद्र हे जागीच ठार झाले, तर पत्नी अश्विनी या गंभीर जखमी झाल्या.
सासऱ्याच्या वर्षश्राद्धासाठी आले आणि आक्रित घडलं
चेतन आणि अश्विनी हे दोघेही मुंबईत राहतात, दोघेही आयटी क्षेत्रात काम करतात. चेतन यांच्या सासऱ्यांच्या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी ते तळेगावला आले होते. शुक्रवारी कार्यक्रम आटोपल्यानंतर शनिवारी काही कामानिमित्त ते लातूरला गेले होते. काम आटोपल्यावर परत जाताना त्यांच्यावर काळाने झडप घातली.
जखमी पत्नीवर लातूरमध्ये उपचार
अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक बालाजी भंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अश्विनी यांना उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले असून, मृतदेहाचे शवविच्छेदन चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला सारून वाहतूक सुरळीत केली.
Web Summary : A Mumbai IT engineer died and his wife was critically injured near Latur when their motorcycle collided with a tractor carrying sugarcane. They were returning from a ceremony when the accident occurred. The wife is receiving treatment in Latur.
Web Summary : लातूर के पास गन्ने से लदे ट्रैक्टर से मोटरसाइकिल की टक्कर में मुंबई के एक आईटी इंजीनियर की मौत हो गई और उनकी पत्नी गंभीर रूप से घायल हो गईं। वे एक समारोह से लौट रहे थे तभी यह दुर्घटना हुई। पत्नी का लातूर में इलाज चल रहा है।