लातूरात थरार! सिनेस्टाईल पाठलाग करुन गांजा पकडला; दाेघांना अटक
By राजकुमार जोंधळे | Updated: October 25, 2023 19:48 IST2023-10-25T19:48:26+5:302023-10-25T19:48:44+5:30
लातुरातील घटना : कारसह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

लातूरात थरार! सिनेस्टाईल पाठलाग करुन गांजा पकडला; दाेघांना अटक
लातूर : चाेरट्या मार्गाने गांजाची वाहतूक करणाऱ्या कारचा सिनेस्टाईल पाठलाग करुन दाेघांना अटक केली. ही घटना बुधवारी लातुरात घडली. त्यांच्याकडून गांजासह कार ९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई दशहतवाद विराेधी शाखा, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे केली आहे. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील नवीन रेणापूर नाका परिसरात चाेरट्या मार्गाने गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी शाखेच्या प्रमुखांना खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे पाेलिस पथकाने बुधवारी गांजाची विक्रीसाठी वाहतूक करत असलेली कार (एम.एच. २४ एडब्ल्यू ९३४०) पाठलाग करुन पकडली.
यावेळी कारची झडती घेतली असता, डिक्कीत ठेवण्यात आलेला बी मिश्रीत ३.२१५ किलाेग्रॅम गांजा पथकांनी जप्त केला. यावेळी शरीफ लतीफ शेख (३५, रा. कॉईल नगर, लातूर) आणि वसीम बाबूलाल अत्तार (२६, रा. धर्मापुरी ता. परळी जि. बीड) यांना अटक केली. तर ईश्वर नवनाथ फड (रा. धर्मापुरी ता. परळी) हा फरार झाला आहे. यावेळी कारसह बी-मिश्रीत गांजा, कारसह इतर साहित्य असा ९ लाख ३१ हजार ८२५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांच्या पथकांची संयुक्त करावाई...
पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध व्यवसायावर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अवैध व्यवसायावर धाडी मारण्यात येत आहेत. अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, सपोनि. प्रवीण राठोड, पोउपनि. आयुब शेख, उत्तम जाधव, अंगद कोतवाड, संपत फड, मोहन सुरवसे, नाना भोंग, सचिन धारेकर, सचिन मुंडे, नकुल पाटील, संजय काळे, चंद्रकांत केंद्रे, राहुल सोनकांबळे, सुहास जाधव, धनंजय गुट्टे यांच्या पथकाने ही कारवाई केली.