५५ हजारांच्या पत्र्यांची चोरी; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST2021-07-22T04:14:15+5:302021-07-22T04:14:15+5:30

उदगीर शहरातून दुचाकी पळविली लातूर : उदगीर शहरातील उद्योग भवन परिसरात थांबविण्यात आलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना १३ ...

Theft of 55,000 letters; Filed a crime | ५५ हजारांच्या पत्र्यांची चोरी; गुन्हा दाखल

५५ हजारांच्या पत्र्यांची चोरी; गुन्हा दाखल

उदगीर शहरातून दुचाकी पळविली

लातूर : उदगीर शहरातील उद्योग भवन परिसरात थांबविण्यात आलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना १३ जुलै रोजी घडली. याबाबत उदगीर शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मुशीर हबीब तांबोळी (४०, रा.गोपाळनगर, उदगीर) यांनी आपल्या ताब्यातील मोटारसायकल (एमएच २४ एव्ही ४४२७) उद्योग भवन परिसरात थांबविली होती. दरम्यान, ती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत उदगीर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना.मंडोळे करीत आहेत.

जुन्या घरातील मीटरची चोरी

लातूर : बंद असलेल्या जुन्या घरातील मीटर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना अहमदपूर शहरातील ईदगाह रोड परिसरात १८ ते १९ जुलै दरम्यान घडली. याबाबत अहमदपूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात मंगळवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी सचिन निवृत्ती डोंगरे (२८, रा.ईदगाह रोड, अहमदपूर) हे नवीन घर बांधकाम केल्यानंतर तेथे राहायला गेले. दरम्यान, जुने घर बंद असल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घरातील मीटर लंपास केले. सदरची घटना १८ ते १९ जुलै दरम्यान घडली. याबाबत अहमदपूर पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ. साळवे करीत आहेत.

Web Title: Theft of 55,000 letters; Filed a crime