शुगर मिलमध्ये भूस्याच्या ढिगाऱ्यावरून कोसळून तरुणी साखळीत अडकली; झाला जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 16:22 IST2022-03-29T16:21:40+5:302022-03-29T16:22:13+5:30
भुसाच्या ढिगा-यावरुन पाय घसरुन ताेल गेल्याने चैनच्या पट्यात व रॉडमध्ये अडकून झाला मृत्यू

शुगर मिलमध्ये भूस्याच्या ढिगाऱ्यावरून कोसळून तरुणी साखळीत अडकली; झाला जागीच मृत्यू
औराद शहाजानी ( जालना ) : निलंगा तालुक्यातील हलगरा येथील हनुमान खांडसरी शुगर मिल्समध्ये मंगळवारी सकाळी ५.३० वाजता कारखान्यातील बॉयलरला भुसा इंधन पुरवठा करणाऱ्या चैनमध्ये अडकल्याने २० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला.
हलगरा येथील हनुमान खांडसरी शुगर मिलमध्ये मंगळवारी सकाळी ५.३० वाजता सीता जाण्या वडवी (२०, रा. काञी ता. धडगाव जि. नंदुरबार ) कारखान्यात बॉयलरला इंधन पुरवठा करणारा भुसा टाकण्याचे काम करत होत्या. त्याच वेळेस अचानक भुसाच्या ढिगा-यावरुन पाय घसरुन ताेल गेल्याने चैनच्या पट्यात व रॉडमध्ये त्या अडकल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती कारखाना प्रशासनाने औराद शहाजानी पाेलिस ठाण्याला दिली असून, घटना स्थळाचा पंचनामा पाेलिस नाईक लतिफ साैदागर, पाेलिस कर्मचारी विश्वनाथ डाेंगरे यांनी केला. नातेवाईक आल्यानंतर शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे पाेलिसांनी सांगितले.