लातूर अन् उदगीर परिसरातील हाॅटेल, धाब्यावर एक्साईजच्या पथकाचा छापा

By राजकुमार जोंधळे | Updated: October 8, 2022 18:49 IST2022-10-08T18:49:06+5:302022-10-08T18:49:19+5:30

राज्य उत्पादनची कारवाई : न्यायालयाने केला ८५ हजारांचा दंड...

The team raided hotels in Latur and Udgir area, Dhaba | लातूर अन् उदगीर परिसरातील हाॅटेल, धाब्यावर एक्साईजच्या पथकाचा छापा

लातूर अन् उदगीर परिसरातील हाॅटेल, धाब्यावर एक्साईजच्या पथकाचा छापा

लातूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाने लातूर आणि उदगीर परिसरात असलेल्या हाॅटेल आणि धाब्यावर छापा मारुन चालकावर कारवाई केली आहे. याबाबत हाॅटेल, धाबा मालकांना ताब्यात घेत त्यांच्याविराेधज्ञत महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना न्यायालयाने ८५ हजारांचा दंड केला आहे. 

राज्य उत्पादन शुल्क विभाग, औरंगाबादचे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, लातूरचे प्रभारी अधीक्षक अभिजित देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर आणि उदगीर परिसरातील अवैध हाॅटेल, धाब्यावर छापा मारला.  लातूर शहरातील अंबाजाेगाई राेडवरील आकाश धाबा, औसा रिंग राेड येथील शिवनेरी धाबा आणि उदगीर तालुक्यातील करडखेल येथील जय मल्हार धाब्यावर लातूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा मारला. यावेळी मद्यपीसह धाबा मालकांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, त्यांच्याविराेधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ आणि ८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लातूर आणि उदगीर येथील न्यायालयाने तिघांना ८५ हजारांचा दंड ठाेठावला आहे. 

ही कारवाई लातूरचे निरीक्षक आर.एम. बांगर, उदगीरचे निरीक्षक आर. एम.चाटे, सहायक दुय्यम निरीक्षक एल.बी. माटेकर, ए.के. शिंदे, स्वप्निल काळे, अ.ब. जाधव, सहायक दुय्यम निरीक्षक ए.एल. कारभारी, गणेश गाेले, अनिरुद्ध देशपांडे, हनुमंत मुंडे, संताेष केंद्रे, सुरेश काळे, श्रीकांत सांळुके, ज्याेतीराम पवार यांच्या पथकाने केली.

 

Web Title: The team raided hotels in Latur and Udgir area, Dhaba