चोरट्याचे धाडस, खिडकीतून घुसून घरफोडी; सहा तोळे सोन्यासह २५ हजारांची रोकड पळवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 17:44 IST2022-09-27T17:43:19+5:302022-09-27T17:44:02+5:30
मार्केट यार्डच्या बाजूस असलेल्या आनंदनगर येथील घरात झाली चोरी

चोरट्याचे धाडस, खिडकीतून घुसून घरफोडी; सहा तोळे सोन्यासह २५ हजारांची रोकड पळवली
उदगीर (जि.लातूर) : येथील मार्केट यार्डच्या बाजूला असलेल्या आनंदनगर भागात एका घरामध्ये अज्ञात चोरट्याने घरात घुसून सहा तोळे सोने व २५ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ५ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी सोमवारी रात्री उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, मार्केट यार्डच्या बाजूस असलेल्या आनंदनगर येथील रहिवासी शिवराज मारोती बिरादार यांच्या घरामध्ये शनिवारी १२ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने खिडकीतून आत प्रवेश करून कपाटात ठेवलेले ६ तोळे सोने व २५ हजार रुपये रोख असा २ लाख ५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला दरम्यान चोर खिडकीवाटे पळून जात असताना भाडेकरुन त्याच्या पायाला पकडले. मात्र, चोरट्याने भाडेकरुच्या हातावर हत्याराने वार केला. याबाबत शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.