उदगीरातील शेल्हाळ शिवारात आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह !
By राजकुमार जोंधळे | Updated: September 8, 2023 18:57 IST2023-09-08T18:57:40+5:302023-09-08T18:57:52+5:30
शेल्हाळ गावाच्या शिवारात असलेल्या एका सोयाबीन ऑईल मीलच्या पाठीमागे

उदगीरातील शेल्हाळ शिवारात आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह !
उदगीर (जि. लातूर) : तालुक्यातील शेल्हाळ शिवारातील सोयाबीन ऑइल मिलच्या कंपाउंडलगत ३५ ते ४० वर्षाच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सायंकाळी आढळून आला आहे. याबाबत उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले, उदगीर शहरानजीक असलेल्या शेल्हाळ गावाच्या शिवारात असलेल्या एका सोयाबीन ऑईल मीलच्या पाठीमागे कंपाउंडलगत असलेल्या नाल्यात एका ३५ ते ४० वर्ष वय असलेल्या पुरुषाचा मृतदेह आढळल्याचे किशन रमेश मोरे यांनी कारखाना मालकास सांगितले. घटनेची माहिती कळाल्यानंतर मील मॅनेजरने उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन कुजलेल्या मृतदेहाच पंचनामा केला. याबाबत उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक देवकत्ते करत आहेत.