शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना

By राजकुमार जोंधळे | Updated: May 19, 2025 20:36 IST

रेल्वे उड्डाणपुलावर या दोन वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यामध्ये प्रतिक्षा पस्तापुरे, सुमन धोत्रे आणि शिवाजी कतलाकुटे हे तिघे जागीच ठार झाले.

- राजकुमार जोंधळे, लातूरबार्शी महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर सोमवारी सांयकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ऑटो आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. यात ऑटोतील तीन प्रवासी जागीच ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

प्रतिक्षा संतोष पस्तापुरे (वय १० रा. बारानंबर पाटी, लातूर), सुमन सुरेश धोत्रे (वय ५८ रा. सावेववाडी, लातूर) आणि शिवाजी ज्ञानोबा कतलाकुटे (वय ५२ रा. बारानंबर पाटी, लातूर) अशी मयतांची नावे आहेत.

ऑटो-ट्रॅक्टरचा अपघात कसा झाला?

पोलिसांनी सांगितले, लातूर-बार्शी महामार्गावरुन बारानंबर पाटीकडे प्रवासी ऑटो (एमएच २४ ए.टी. ८४६९) निघाला होता. दरम्यान, बारानंबर पाटीकडून ट्रॅक्टर (एमएच २४ एजी २२४८) लातूर शहरात येत होता.

वाचा >>भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

रेल्वे उड्डाणपुलावर या दोन वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यामध्ये प्रतिक्षा पस्तापुरे, सुमन धोत्रे आणि शिवाजी कतलाकुटे हे तिघे जागीच ठार झाले. ऑटोतील इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. 

फरार ट्रॅक्टर चालकाला पकडले

या जखमी प्रवाशांची नावे रात्री उशिरापर्यंत कळू शकली नाहीत. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव जगताप यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन पाहणी केली. 

घटनास्थळावरुन ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. अपघातातनंतर पळून गेलेल्या ट्रॅक्टर चालकाला काही वेळात पकडल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूLatur policeलातूर पोलीसCrime Newsगुन्हेगारी