पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!

By राजकुमार जोंधळे | Updated: September 21, 2024 22:38 IST2024-09-21T22:37:22+5:302024-09-21T22:38:35+5:30

लातूर-औसा महामार्गावरील अपघात

Superfast Travel Bus from Pune to Latur met with an accident as 5 passengers injured | पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!

पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!

राजकुमार जाेंधळे, लातूर: पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटल्याची घटना लातूर-औसा महामार्गावरील वासनगाव पाटीनजीक शनिवारी सकाळी ५:४५ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात झाेपेत असलेले पाच प्रवासी जखमी झाले. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात ट्रॅव्हल्स चालकाविराेधात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, पुणे येथून लातूरच्या दिशेने निघालेली ट्रॅव्हल्स (एम.एच. १९ सी.वाय. ९९१८) लातूरनजीक आली असता, वासनगाव पाटी येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स दुभाजकावर चढली. यामध्ये ट्रॅव्हल्समधील पाच प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर लातूर ग्रामीण ठाण्याचे पाेलिस निरीक्षक अरविंद पवार यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याबाबत ट्रॅव्हल्सचालक विठ्ठल नारायण गायकवाड (वय ४३ रा. आष्टा ता. चाकूर) याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: Superfast Travel Bus from Pune to Latur met with an accident as 5 passengers injured