लातूरच्या वाहतुक नियंत्रकाची पत्नीसह आत्महत्या  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 12:44 IST2018-07-05T12:43:59+5:302018-07-05T12:44:34+5:30

तालूक्यातील घनसरगाव येथे पति-पत्नी ने बुधवारी (दि. ४) रात्री ११ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

Suicides with wife of traffic controller of Latur | लातूरच्या वाहतुक नियंत्रकाची पत्नीसह आत्महत्या  

लातूरच्या वाहतुक नियंत्रकाची पत्नीसह आत्महत्या  

रेणापूर (लातुर) : तालूक्यातील घनसरगाव येथे पति-पत्नी ने बुधवारी (दि. ४) रात्री ११ वाजता आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सरोज (३२) व संदीपान प्रभाकर गिरी (४८) असे मृतांची नावे आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून रेणापूर पोलीस अधिक तपास करत आहेत. 

मयत संदीपान प्रभाकर गिरी हे एस .टी. महामंडळा च्या लातूर विभागात कार्यरत आहेत. त्यांनी अनेक वर्ष वाहक म्हणून कार्य केले. ८ दिवसांपूर्वीच त्यांची वाहतुक नियंत्रक पदावर बढती मिळाली. सध्या ते लातुरच्या मुख्य बसस्थानकात वाहतुक नियंत्रक म्हणून कार्यकरत होते. या प्रकरणी पुढील तपास पोउपनि पी. पी.सोमवंशी हे करत आहेत. 

Web Title: Suicides with wife of traffic controller of Latur