युवक-युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 00:40 IST2019-04-06T00:40:20+5:302019-04-06T00:40:43+5:30

लातुरातील घटना : एमआयडीसी पोलिसांनी केली घटनास्थळाची पाहणी

Suicide by taking robbery of youth-maiden | युवक-युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

युवक-युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

लातूर : शहरातील क्रांतीनगर येथे युवक-युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.  

पोलिसांनी सांगितले, खाडगाव रोड परिसरातील क्रांतीनगर येथे फिरोज सय्यद (३२) आणि तरन्नुम शेख (२२) या दोघांनी राहत्या घरात गळफास घेतला. घरातील मंडळी लग्नसोहळ्याला बाहेर गेले होते. दरम्यान, घरात कोणीच नसल्याचे पाहून सदर युवक-युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. सायंकाळी कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना दुपारी ३ त ४ वाजण्याच्या सुमारास घडली असावी, असे सहायक पोलीस निरीक्षक अशोक माळी यांनी सांगितले. घटनास्थळी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.

Web Title: Suicide by taking robbery of youth-maiden