शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
7
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
8
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
9
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
10
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
11
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
12
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
13
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
14
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
15
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
16
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
17
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
18
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
19
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
Daily Top 2Weekly Top 5

सावरगाव थोट येथे निर्जंतुकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:18 IST

येथे निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात आली. गावातील मुख्य रस्ते, गल्लीबोळातही फवारणी करण्यात आली. तसेच कोविड लसीकरण वाढावे म्हणून घरपट्टीत ५ ...

येथे निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात आली. गावातील मुख्य रस्ते, गल्लीबोळातही फवारणी करण्यात आली. तसेच कोविड लसीकरण वाढावे म्हणून घरपट्टीत ५ टक्के सवलत देण्यात आली आहे.

थोट सावरगाव येथील ग्रामपंचायतीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गावातील प्रत्येक वॉर्डातील गल्लीबोळातील रस्त्याची साफसफाई करण्यात येत आहे. तसेच कोविड चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. गावच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. गावात दवंडी देऊन जनजागृती करण्यात आली आहे. लसीकरण वाढावे म्हणून घरपट्टीत ५ टक्के सवलत देण्यात आली आहे. ५० वर्षांपुढील नागरिकांनी घराबाहेर पडू नये. परगावचा व्यक्ती गावात येण्यास मनाई करण्यात आली आहे.

उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट...

उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी

अमोलकुमार आंदेलवाड यांनी थोट सावरगाव ग्रामपंचायतीस भेट देऊन पाहणी केली. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी सरपंच ईश्वर खंदारे, मंडळ अधिकारी क्षीरसागर, शिवराज कांबळे, ग्रामसेवक दत्ता पाटील, आरोग्यसेवक कासले आदी उपस्थित होते.

नागरिकांनी काळजी घ्यावी...

नागरिकांचे सहकार्य मिळाल्यास कोणत्याही संकटावर नियंत्रण मिळविता येते. नागरिकांनी आपली व कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन ग्रामसेवक दत्ता पाटील यांनी केले आहे.