शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याने मोघा ओढत केली पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:46 IST

मसलगा : निलंगा तालुक्यातील मसलगा येथील अतिवृष्टीग्रस्त एका शेतकऱ्याने तुरीचे पीक उखडून टाकले आणि नव्या उमेदीने उसाची लागवड केली. ...

मसलगा : निलंगा तालुक्यातील मसलगा येथील अतिवृष्टीग्रस्त एका शेतकऱ्याने तुरीचे पीक उखडून टाकले आणि नव्या उमेदीने उसाची लागवड केली. मोघाच्या सहाय्याने आंतरपीक म्हणून हरभऱ्याची लागवड करण्यास सुरुवात केली आहे.

ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकांवर नांगर फिरविला होता. मसलगा येथील शेतकरी तुळशीदास साळुंके यांनी एक हेक्टरवर टोकन पध्दतीने सोयाबीन व तुरीची लागवड केली होती. परंतु, अतिवृष्टीमुळे दोन्ही पिके हातची गेली. पाण्यामुळे तुरीचा खराटा झाल्याने हे पीक उखडून टाकले.

पुन्हा नव्या उमेदीने चार फूट सरी सोडून नोव्हेंबरमध्ये ऊस लागवड केली. सध्या अल्पशा पाण्यावर ड्रिपच्या साह्याने जमीन भिजवून अडीच एकर शेतीमध्ये आंतरपीक म्हणून मोघा हाताने ओढून हरभऱ्याची पेरणी केली आहे.

ऊस लागवडीमुळे बैलावरुन पेरणी अशक्य...

गोमूत्रापासून जीवामृत तयार करुन दोन डोळा पद्धतीच्या बेण्यास सात मिनिटे भिजवून ठेवल्याने खोड किडीपासून उसाचे संरक्षण होते. ऊस लागवड केल्याने बैल अथवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करणे शक्य नसल्याने मळ्याच्या साह्याने हाताने ओढून एक हेक्टरवर हरभऱ्याची साखळी पद्धतीने पेरणी केल्याचे तुळशीदास साळुंके यांनी सांगितले.

५० टक्के मदतीचे वाटप...

ऑक्टोबरमधील अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले. परंतु, अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

तालुक्यातील ५० टक्के शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना शासनाकडून निधी उपलब्ध होताच मदत देण्यात येईल, असे तहसीलदार गणेश जाधव यांनी सांगितले.

***