आजारी आईच्या औषधोपचारासाठी मुलानेच जन्मदात्याचा गळा चिरला! आराेपी मुलाला अटक : खाेपेगाव पाटी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 20:52 IST2026-02-03T20:52:17+5:302026-02-03T20:52:45+5:30

पोटच्याच २९ वर्षीय मुलाने आयकर विभागात अधिकारी असलेल्या आपल्या जन्मदात्या पित्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना खोपेगाव (ता. लातूर) येथे मंगळवारी सकाळी ९:४५ वाजण्याच्या सुमारास घडली.

Son slits his biological father's throat to get medicine for his sick mother! Accused boy arrested: Incident at Khopegaon Pati | आजारी आईच्या औषधोपचारासाठी मुलानेच जन्मदात्याचा गळा चिरला! आराेपी मुलाला अटक : खाेपेगाव पाटी येथील घटना

आजारी आईच्या औषधोपचारासाठी मुलानेच जन्मदात्याचा गळा चिरला! आराेपी मुलाला अटक : खाेपेगाव पाटी येथील घटना

राजकुमार जाेंधळे

लातूर : ‘आईला दवाखान्यात नेण्यासाठी पैसे का देत नाहीत? आमचा सांभाळ का करत नाहीत?’ असा जाब विचारत पोटच्याच २९ वर्षीय मुलाने आयकर विभागात अधिकारी असलेल्या आपल्या जन्मदात्या पित्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना खोपेगाव (ता. लातूर) येथे मंगळवारी सकाळी ९:४५ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, मुलाला अटक केली आहे.

पाेलिसांनी सांगितले, खोपेगाव पाटी परिसरात राहणारे कृष्णकुमार संभाजी सन्मुखराव (वय ५४) आणि त्यांचा मोठा मुलगा शंतनू (२९) यांच्यामध्ये मंगळवारी सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास वाद झाला. शंतनूची आई आजारी असल्याने त्यांच्या औषधोपचारासाठी तो वडिलांकडे पैशांची मागणी करत होता. ‘तुम्ही आईच्या उपचारासाठी नेहमी पैसे का देत नाहीत? आणि आमचा सांभाळ का करत नाहीत?’ यावरून मुलगा आणि वडिलांमध्ये वादाची ठिणगी पडली. या वादाचे रूपांतर काही वेळातच हाणामारीमध्ये झाले.

रागाच्या भरात असलेल्या शंतनूने घरातील भाजी कापण्याचा चाकू आणला आणि थेट वडिलांच्या मानेच्या खालच्या बाजूवर वार केले. हा वार एवढा भीषण होता की, कृष्णकुमार सन्मुखराव यांचा जागीच मृत्यू झाला. ज्या बापाने बोट धरून चालायला शिकवले, त्याच बापाचे रक्त मुलाच्या हाताला लागल्याने परिसरात संतापाची लाट पसरली. रक्ताच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने लातूरसह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मयताचा धाकटा मुलगा समीर कृष्णकुमार सन्मुखराव (२३) याने दिलेल्या फिर्यादीवरून लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपी भाऊ शंतनू याच्याविराेधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आराेपी मुलाला पाेलिसांनी बेड्या ठाेकल्या आहेत. 

आयकर विभागामध्ये अधिकारी म्हणून कार्यरत...

मृत हे लातूर येथे आयकर विभागात अधिकारी म्हणून कार्यरत हाेते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी खाेपेगाव पाटी येथे जागा घेऊन नवीन घर बांधले हाेते. ते नेहमीप्रमाणे कार्यालयात निघाले असता पत्नीने औषध-गाेळ्यांसाठी पैशांची मागणी केली. यातूनच दाेघा पती-पत्नीत वाद झाला अन् मुलाने गळ्यावर चाकूने वार केले. घाव एवढे जबर हाेते की, कृष्णकुमार यांचा जागीच मृत्यू झाला.

आराेपी मुलगा शंतनू पदवीधर

आराेपी मुलगा पदवीधर असून ताे बेराेजगार हाेता. आई-वडिलांचे मंगळवारी सकाळी औषध-गाेळ्यांवरून झालेल्या वादानंतर मुलाने वडिलांवर हा हल्ला केला. यात माेठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने वडिलांचा जागीच मृत्यू झाला. - अरविंद पवार, पाेलिस निरीक्षक, लातूर

Web Title : मां के इलाज के लिए बेटे ने पिता को मार डाला

Web Summary : लातूर में, एक 29 वर्षीय बेटे ने अपनी बीमार माँ के इलाज के लिए पैसे को लेकर हुए विवाद के बाद अपने पिता, जो कि आयकर अधिकारी थे, की चाकू मारकर हत्या कर दी। बेरोजगार बेटे ने घर पर बहस के दौरान चाकू से हमला किया। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है।

Web Title : Son Kills Father Over Money for Mother's Medical Treatment

Web Summary : In Latur, a 29-year-old son fatally stabbed his father, an income tax officer, following a dispute over money for his ailing mother's treatment. The son, unemployed and a graduate, attacked his father with a knife during an argument at their home. Police have arrested the accused.