किल्लारी येथे फिर्यादी मुलगाच निघाला बापाचा मारेकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 21:08 IST2018-09-17T21:07:49+5:302018-09-17T21:08:57+5:30

मुलाने दिलेल्या माहितीवरून किल्लारी पोलिसांनी प्रारंभी आकस्मात मृत्यूची नोंद केली़ होती

son arrested in father's murder at killari | किल्लारी येथे फिर्यादी मुलगाच निघाला बापाचा मारेकरी

किल्लारी येथे फिर्यादी मुलगाच निघाला बापाचा मारेकरी

किल्लारी (जि़ लातूर)- औसा तालुक्यातील संक्राळ येथे नामदेव सहदेव माळी (६५) यांचा स्वत:च्या शेतात विहिरीत पडून मृत्यू  झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली होती़  याप्रकरणी मुलाने दिलेल्या माहितीवरून किल्लारी पोलिसांनी प्रारंभी आकस्मात मृत्यूची नोंद केली़  पंचनामा व पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मात्र अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल केला़  पोलिसांनी  अधिक तपास केल्यावर फिर्यादी मुलगाच आरोपी निघाला असून त्यास सोमवारी अटक करण्यात आली आहे़ 

१५ सप्टेंबर रोजी सकाळी नामदेव सहदेव माळी (६५) यांच्या  ङोक्यात व ईतर ठिकाणी मारुन त्यांच्या शेतातील विहीरीत टाकण्यात आले होते़ याप्रकरणी मुलगा बालाजी नामदेव माळी याने किल्लारी पोलिस स्टेशनला वडिल नामदेव माळी यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची माहीती दिली़ त्यानुसार आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती़ मृतदेहाचा शवविच्छेदनाचा अहवाल रविवारी आल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला़ यात  फिर्यादी मुलानेच बापाच्या कपाळावर व इतर ठिकाणी मारून खून केल्याचे उघडकीस आले़  तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत विहिरीत टाकून दिल्याचे पोलिसांनी सांगितले़

याप्रकरणी सपोनि़ संदीप कामत, पोउपनि़ गणेश कदम, पोहेकॉ़ गणेश यादव, पोकॉ़ साहेबराव सावंत यांनी खूनाचा उलगडा केला आहे़ याबाबत पोहकॉ़ गणेश यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बालाजी नामदेव माळी याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे़

Web Title: son arrested in father's murder at killari