भावकी उठली जीवावर; सामाईक बांधाच्या वादातून शेतकऱ्यावर चुलत भावंडांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 14:34 IST2020-11-04T14:31:54+5:302020-11-04T14:34:25+5:30

धारदार चाकुने छाती, पोटावर वार करुन खून करण्याचा प्रयत्न

Siblings attack farmer over common land stone dispute | भावकी उठली जीवावर; सामाईक बांधाच्या वादातून शेतकऱ्यावर चुलत भावंडांचा हल्ला

भावकी उठली जीवावर; सामाईक बांधाच्या वादातून शेतकऱ्यावर चुलत भावंडांचा हल्ला

ठळक मुद्देसात जणांवर गुन्हा दाखल

किल्लारी (जि़ लातूर) : भावा- भावाच्या शेतातील सामाईक बांधावरील दगड काढण्याच्या कारणावरुन सात जणांनी एकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन तसेच चाकुने वार करुन खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नणंद (ता़ निलंगा) येथे घडली़ याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.

पोलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील नणंद येथील फिर्यादी प्रल्हाद कडाप्पा उस्तुरे यांना शेतातील सामाईक बांधावरील खुण असलेला दगड का उपसलास म्हणून भावकीतील महादेव उस्तुरे, अण्णाराव उस्तुरे, अशोक उस्तुरे, सिध्देश्वर उस्तुरे, संतोष उस्तुरे, लहु ऊस्तुरे, हिरकणाबाई उस्तुरे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली़ तसेच महादेव उस्तुरे यांनी धारदार चाकुने छाती, पोटावर वार करुन खून करण्याचा प्रयत्न केला़ तसेच फिर्यादीचा भाऊ धोडिंराम उस्तुरे यास सिध्देश्वर उस्तुरे याने चावा घेऊन जखमी केले़ तसेच आरोपींनी फिर्यादी व साक्षीदारांना जीवे मारण्याची धमकी दिली़
याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ एका आरोपीस अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपी फरार आहेत़ अधिक तपास सपोनि़ म्हेत्रेवार, पीएसआय अमोेल गुंडे, बीट जमादार अनिल शिंदे हे करीत आहेत़

Web Title: Siblings attack farmer over common land stone dispute