लातुरात मोबाईल चोऱ्यां सुरूच; दोन विद्यार्थ्यांना सहा जणांची मारहाण, मोबाईल हिसकावून फरार
By राजकुमार जोंधळे | Updated: November 16, 2022 18:02 IST2022-11-16T18:00:38+5:302022-11-16T18:02:09+5:30
लातुरातील घटना : सहा जणांविराेधात गुन्हा दाखल

लातुरात मोबाईल चोऱ्यां सुरूच; दोन विद्यार्थ्यांना सहा जणांची मारहाण, मोबाईल हिसकावून फरार
लातूर : दाेन माेटारसायकलवरुन आलेल्या सहा जणांनी विद्यार्थ्यांसह साेबतच्या मित्राला वाटेत अडवून मारहाण केली. यावेळी त्यांच्याकडील माेबाइल जबरदरस्तीने हिसकावत पळ काढल्याची घटना लातुरातील नारायण नगर भागात घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात सहा जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी प्रविण महादेव कांदे (वय २० रा. तांबवा ता. केज, जि. बीड) हा आपल्या मित्रासाेबत अभ्यासिकेतून भाड्याच्या खाेलीकडे जाता हाेता. दरम्यान, नारायण नगर भागात माेटारसायकलवरुन आलेल्या तिघांनी त्यांना वाटेतच अडवली. तुमच्याकडे किती पैसे व माेबाइल आहेत? असे विचारले. ते आम्हाला द्या, म्हणून फिर्यादी आणि त्याच्या मित्राला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी फिर्यादीच्या हातातील माेबाइल जबरदस्तीने हिसकावत काढून घेतला. त्याचेबराेबर घटनास्थळावरुन पलायन केले. ही घटना लातुरातील नारायण नगर भागात १४ नाेव्हेंबर राेजी घडली.
याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात कातळे, खाडे याच्यासह एकूण सहा जणांविराेधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलीस उपनिरीक्षक माेरे करत आहेत.