शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

‘सैयारा तू तो बदला नही है...’; काँग्रेसला गळती, अमित देशमुखांचा 'शायराना' पलटवार..!

By हणमंत गायकवाड | Updated: November 29, 2025 11:55 IST

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी पक्षांतर करणाऱ्यांवर थेट हल्ला करणे टाळत, अत्यंत सूचक आणि भावनिक टिप्पणी करत राजकीय वातावरण तापवले आहे.

- हणमंत गायकवाडलातूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर लातूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षातून मोठ्या प्रमाणावर पक्षांतर सुरू झाल्याने पक्षाला मोठे धक्के बसले आहेत. पक्षातून महत्त्वाचे चेहरे बाहेर पडल्यामुळे काँग्रेसचे नुकसान होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. पक्षांतराच्या धक्क्यांचा मतदारांवर किती प्रभाव पडतो, हे लवकरच समजेल. दरम्यान, पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी पक्षांतर करणाऱ्यांवर थेट हल्ला करणे टाळत, अत्यंत सूचक आणि भावनिक टिप्पणी करत राजकीय वातावरण तापवले आहे.

जिल्ह्यात झालेले महत्त्वाचे पक्षांतर काँग्रेससाठी चिंतेचा विषय ठरला आहे. पक्षांतर केलेल्या नेत्यांनी नेतृत्वावर नाराजी दर्शवत किंवा राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पक्ष सोडला आहे. माजी आमदार त्र्यंबक भिसे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, माजी नगरसेवक गिरीश पाटील, जिल्हा बँकेचे माजी संचालक नाथसिंह देशमुख यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तर माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश करून हाती घड्याळ बांधले आहे. या प्रमुख नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्याने जिल्ह्यातील पक्षाची ताकद कमी होईल, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. पण एवढ्या मोठ्या स्थानिक नेत्यांचे काँग्रेसमधून पहिल्यांदाच पक्षांतर झाले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

देशमुखांची मतदारांना भावनिक सादया पार्श्वभूमीवर, आमदार अमित देशमुख यांनी अहमदपूर येथील महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत पक्षांतर करणाऱ्यांवर शाब्दिक हल्ला करण्याऐवजी 'शायराना' पद्धतीने मतदारांना साद घातली. त्यांनी मतदारांना उद्देशून मार्मिक शब्दांत विधान केले.

‘सैयारा तू तो बदला नही है...मौसम जरा सा रुठा हुआ है’देशमुख यांनी मतदारांना 'सैयारा' (निष्ठावान) असे संबोधले आहे. पक्षांतर झाले असले तरी, जनता आणि मतदारांनी आपली निष्ठा कायम ठेवावी. हे केवळ ''रुसलेले'' राजकीय वातावरण (मौसम) बदलण्याची जबाबदारी जनतेची आहे, असे भावनिक आवाहन त्यांनी केले. या सूचक टिप्पणीतून, पक्षांतरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई निष्ठावान मतदारांच्या पाठिंब्याने करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न स्पष्ट दिसून येतो.

मतदारांवर कोणाचा प्रभाव..!सध्या अहमदपूर, औसा, निलंगा, उदगीर नगरपरिषद आणि रेणापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. जिल्हा परिषद आणि लातूर महापालिकेची निवडणूकही आगामी काळात आहे. त्यामुळे पक्षांतराच्या या धक्क्यांचा आणि अमित देशमुखांच्या भावनिक आवाहनाचा मतदारांच्या निर्णयावर किती प्रभाव पडतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress exodus in Latur; Amit Deshmukh's poetic retort to defectors.

Web Summary : Latur Congress faces defections ahead of local elections. Amit Deshmukh responded with a poetic appeal, urging voters to remain loyal amid the political shift, hoping to offset losses with voter support.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकlaturलातूरBJPभाजपाcongressकाँग्रेस