चारचाकी वाहनाची धडक; एकजण जखमी
लातूर : पीव्हीआर चौकाकडून घराकडे जात असताना अज्ञात चारचाकी वाहनाने भरधाव वेगात येऊन फिर्यादीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात फिर्यादी बेशुद्ध झाले. उजव्या दंडास मार लागला. उजवा पाय घोट्यातून फ्रॅक्चर झाला असून, याबाबत शामूवेल देवानंद भालेकर (रा. मांजरी, ता.जि. लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चारचाकी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ. देशमुख करीत आहेत.
टिप्परची दुचाकीला धडक; एकजण गंभीर जखमी
लातूर : दादोजी कोंडदेव नगर परिसरात भरधाव वेगातील एमएच ४५ - १०४८ या भरधाव वेगातील टिप्पर चालकाने एमएच २४ बीजे ५८१६ या क्रमांकाच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार व त्याचा मित्र जखमी झाले. मोटारसायकलचेही ४० हजारांचे नुकसान झाले. दरम्यान, टिप्पर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. याबाबत इस्माईल जिलानी मानुल्ला (रा. आवंती नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टिप्पर चालकाविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोसई. राठोड करीत आहेत.
मुलाला मुद्दाम का ओरडलास म्हणून मारहाण
लातूर : तू आम्हाला पाहून बाजूच्या हॉटेलमधील मुलास मुद्दाम का ओरडलास असे म्हणून शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. फिर्यादीचे वडील भांडण सोडविण्यास आले असता त्यांनाही लोखंडी पाईपने मारून जखमी करण्यात आले. सदर घटना औसा ते तुळजापूर रोडवरील साईनाथ हॉटेलसमोर घडली. याबाबत चंद्रकांत आशिक धवन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विकास गोकुळ वळते व अन्य तिघांविरुद्ध (सर्व रा. उजनी, ता. औसा) भादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोउपनि. मुळिक करीत आहेत.
दुचाकीची चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा
लातूर : आष्टा मोड येथे पार्किंग केलेल्या बीपी १० ईजे ४७३० या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना २९ मार्च रोजी घडली. याबाबत बळीराम तुकाराम शिंदे (रा. बोरगाव खु., ता. जळकोट) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाकूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोना. मामडगे करीत आहेत.