रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी देवणीत रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:19 IST2021-07-26T04:19:30+5:302021-07-26T04:19:30+5:30
आंदोलनात अशोक लुल्ले, बाबुराव लांडगे, आनंद जीवने, बालाजी वळसांगवीकर, अमित मानकरी, औदुंबर पांचाळ, राजकुमार जीवने, शीतल पाटील, नीळकंठ बिरादार, ...

रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी देवणीत रास्तारोको
आंदोलनात अशोक लुल्ले, बाबुराव लांडगे, आनंद जीवने, बालाजी वळसांगवीकर, अमित मानकरी, औदुंबर पांचाळ, राजकुमार जीवने, शीतल पाटील, नीळकंठ बिरादार, उमाकांत बर्गे, शेख मैनोद्दीन, शेख इस्माईल, बालाजी बिरादार, अनिल रोटे, गोविंद म्हात्रे, शेख वाजिद इलाही मोमीन, माधव तेलंगे, संजय पटणे, नीलेश लांडगे, सुनील चिद्रेवार, गोविंद मोदी, चेतन मिटकरी, योगेश तगरखेडे, श्रीमंत लुल्ले, लक्ष्मण राठोड, राजकुमार देवशेटेवार, अविनाश धनुरे आदी उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार तरंगे यांना दिले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंगारे, पोलीस उपनिरीक्षक रंजित काथवटे आणि सहकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.
वाहन चालविणे कसरतीचे...
वलांडी ते तोगरी क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे काम काही दिवसांपासून रखडले आहे. परिणामी, पावसाळ्यात या रस्त्यावरुन ये-जा करणे कठीण झाले आहे. तसेच वाहन चालविणे कसरतीचे ठरत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. येथील बोरोळ चौकात रस्ता रोको झाले.