शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

हातभट्टी अड्ड्यांवर धाडी; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त, १७ जणांना अटक 

By राजकुमार जोंधळे | Published: May 03, 2024 10:48 PM

यावेळी १७ आराेपींना अटक केली असून, तब्बल ३ लाख ७ हजार ८३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत १९ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लातूर : जिल्ह्यात विविध तांड्यावर सुरु असलेल्या हातभट्टी दारु अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग, लातूर आणि उदगीर, स्थानिक पाेलिस आणि एफएसटीच्या पथकांनी एकाचवेळी शुकवारी धाडी टाकल्या आहेत. यावेळी १७ आराेपींना अटक केली असून, तब्बल ३ लाख ७ हजार ८३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत १९ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क नांदेड विभागाचे उपायुक्त बी.एच. तडवी यांच्या निर्देशानुसार लातूरचे अधीक्षक केशव राउत यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील उदगीर, लातूर परिसरातील हातट्टी अड्ड्यावर धाडी टाकण्यात आल्या. डाेंगरशेळकी तांडा (ता. उदगीर), वसंतनगर तांडा (ता. लातूर) येथे उत्पादन शुल्क विभाग, वाढवणा, उदगीर ग्रामीण पाेलिस, एफएसटी पथकांनी संयुक्तपणे कारवाई केली. या धाडसत्रात १७ आराेपींना अटक केली असून, हातभट्टी दारु - ४६७ लिटर, रसायन - ५ हजार ४५ लिटर, देशी दारु - ८० लिटर, विदेशी दारु - १७ लिटर असा एकूण ३ लाख ७ हजार ८३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विविध पथकांची संयुक्त कारवाई... -ही कारवाई राज्य उत्पादन विभाग उदगीरचे निरीक्षक आर.एम. चाटे, दुय्यम निरीक्षक ए.के. शिंदे, ए.एस. घुगे, एन.डी. कचरे, ज.के. मुंगडे, एम. जी. पाटील, आर.जी. सलगर, सहायक निरीक्षक गणेश गाेले, सुरेश काळे, जे.आर. पवार, श्रीकांत साळुंके, पाेउपनि. गायकवाड, दुय्यम निरीक्षक गायकवाड, आर.आर. नागरगाेजे, आर.डी. सपकाळ, पाेकाॅ. केंद्रे, कलकले, उजेडे, फुलारी, शिंदे, फुलारी, एफएसटी पथकाचे मारमवार, व्ही.आर. दंडे यांच्या पथकांनी केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसliquor banदारूबंदी