हाळी शिवारात जुगारावर छापा; पाेलिसांनी २० जुगाऱ्यांना पकडले

By राजकुमार जोंधळे | Updated: November 15, 2022 18:58 IST2022-11-15T18:58:02+5:302022-11-15T18:58:23+5:30

गुन्हा दाखल : विशेष पाेलिस पथकाची कारवाई

raid on gambling in Hali Shivarat; Police caught 20 gamblers | हाळी शिवारात जुगारावर छापा; पाेलिसांनी २० जुगाऱ्यांना पकडले

हाळी शिवारात जुगारावर छापा; पाेलिसांनी २० जुगाऱ्यांना पकडले

लातूर : जिल्ह्यातील हाळी शिवारात ठिकठिकाणी सुरू असलेल्या जुगारावर विशेष पाेलिस पथकाने छापा मारला. यात जुगाराचे साहित्य, दुचाकीसह ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत वाढवणा पाेलिस ठाण्यात २० जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले की, उदगीर तालुक्यातील हाळी शिवारात वेगवेगळ्या ठिकाणी गाेलाकारात बसून, स्वत:च्या फायद्यासाठी लाेकांकडून पैसे घेऊन मटका-जुगार चालविला जात असल्याची माहिती पाेलिसांना खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे अहमदपूर उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या पथकाने छापा मारला. जुगाऱ्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम आणि दुचाकी असा एकूण ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत वाढवणा (बु.) पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मुंबई जुगार कायद्यानुसार स्वतंत्र तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: raid on gambling in Hali Shivarat; Police caught 20 gamblers