लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 23:54 IST2025-05-21T23:52:31+5:302025-05-21T23:54:12+5:30
पोलिसांनी लॉजच्या व्यवस्थापकासह इतर साथीदार अशा सात जणांना ताब्यात घेतले. याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात लॉजचालक, मालक आणि इतर अशा दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
- राजकुमार जोंधळे, लातूर
स्क्रॅप मार्केटनजीक असलेल्या आनंद लॉजवर एएचटीयू शाखेच्या पथकाने दुपारी छापा टाकला. परराज्यातील दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. या कारवाई पोलिसांनी सात जणांना अटक केली. याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पोलिसांनी सांगितले की, लातुरातील स्क्रॅप मार्केटनजीक असलेल्या आनंद लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याची माहिती मिळाली. लॉजमालक, व्यवस्थापक आणि साथीदार हे परराज्यातील महिलांना लॉजवर आणून वेश्या व्यवसायासाठी एजंटाच्या माध्यमातून ग्राहक शोधत असल्याची खात्रीलायक माहिती खबऱ्याने दिली.
या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार एएचटीयू शाखेच्या पथकाने दुपारी आनंद लॉजवर बनावट ग्राहक पाठवून छापा मारला. या छाप्यात परराज्यातून आणलेल्या दोघा पीडित महिलांची सुटका करण्यात आली.
पोलिसांनी लॉजच्या व्यवस्थापकासह इतर साथीदार अशा सात जणांना ताब्यात घेतले. याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात लॉजचालक, मालक आणि इतर अशा दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कारवाईनंतर पोलीस पथकाकडून लॉज सील
लॉजवर सुरु असलेल्या कुंटणखानाप्रकरणी टाकलेल्या छाप्यानंतर पोलीस पथकाने लॉज सील करण्याची कारवाई केली. यावेळी गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे, सहायक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.