शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या उपविभाग निर्मितीचा प्रस्ताव धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:14 IST

जळकोट तालुका असूनही तालुक्याच्या ठिकाणी महावितरणचे उप विभागीय कार्यालय नसल्याने हा सुविधा नसलेला राज्यातील एकमेव तालुका ...

जळकोट तालुका असूनही तालुक्याच्या ठिकाणी महावितरणचे उप विभागीय कार्यालय नसल्याने हा सुविधा नसलेला राज्यातील एकमेव तालुका ठरत असल्याची ओरड वाढली आहे. प्रत्येक तालुक्यासाठी महावितरणचे उपविभागीय कार्यालय आहे मग जळकोट तालुक्यानेच काय घोडे मारले असा प्रश्न उपस्थित होत आहे. लातूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरचा तालुका आहे. त्यामुळे सर्व बाबतींत शासन व प्रशासनाकडून या तालुक्याकडे दुर्लक्ष होत आहे. असुविधांबद्दल कोणीच दखल घेण्यास तयार नाही. तालुका निर्मितीनंतर सर्व विभागांची कार्यालये तालुका मुख्यालयी स्थापन करणे क्रमप्राप्त ठरते. पण हा तालुका मात्र त्याला अपवाद ठरत आहे. येथे महावितरणचे उप विभागीय कार्यालय नसल्याने तालुक्यातील वीज ग्राहकांना शिरुर ताजबंद व उदगीर येथे चकरा माराव्या लागत आहेत. तालुका एक असला तरी कारभार मात्र तीन तालुक्यांतून चालत असल्याने विचित्र स्वरूपाच्या अडचणींचा मुकाबला जळकोट तालुक्यातील वीज ग्राहकांना करावा लागत आहे. २२ वर्षे लोटूनही हे कार्यालय होत नसल्याने जनतेतून संताप व्यक्त होत आहे. नेतेमंडळींना निवडणुकीत या तालुक्याची आठवण येते, पण तालुक्यातील तब्बल एक लाख लोक दोन दशकांपासून गैरसोयींनी हैराण आहेत याची जाणीव का म्हणून होत नाही असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. तालुक्यातील जनता सर्व संबंधितांची ही नकारात्मक भूमिका कधी संपेल याकडे डोळे लावून बसली आहे.

विकासासाठी उदासीनता...

जळकोट तालुक्याची निर्मिती २२ वर्षांपूर्वी झाली असली तरी अद्यापही अनेक कार्यालये शहरात झालेली नाहीत. त्यामुळे येथील तालुक्यातील नागरिकांना विविध कामांसाठी तीन तालुक्यांशी संपर्क ठेवावा लागत आहे. प्रशासनाने तत्काळ सुविधा पुरवून तालुक्याच्या ठिकाणी असणारी सर्व कार्यालये सुरू करावीत, अशी मागणी होत आहे.