दराेडा टाकण्याची तयारी; पाच पाेलिसांच्या जाळ्यात
By राजकुमार जोंधळे | Updated: February 28, 2023 21:40 IST2023-02-28T21:39:20+5:302023-02-28T21:40:11+5:30
लातुरातील घटना : तलवार, काेयता, चाकू जप्त

दराेडा टाकण्याची तयारी; पाच पाेलिसांच्या जाळ्यात
लातूर : रस्त्यालगत एका झाडाखाली दबा धरून बसलेल्या, दराेडा टाकण्याच्या तयारीतील पाच जणांना पाेलिस पथकाने पकडले. ही घटना कव्हा गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील तलावानजीकच्या परिसरात शनिवारी घडली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सहायक पाेलिस निरीक्षक रामचंद्र केदार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. लातुरातील रिंगराेड परिसरात महात्मा बसवेश्वर चाैक ते कव्हा गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील तालावाच्या राेडवर एका चिंचेच्या झाडाखाली रवी काेंडिबा दाेनगहू (वय ३८, रा. राजीवनगर, लातूर) याच्यासह अन्य चार जण गुन्हा करण्याच्या उद्देशाने, दराेडा टाकण्याच्या तयारीने दबा धरून बसले हाेते. यावेळी पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून काेयता, तलवार, चाकू अशी शस्त्रे जप्त केली आहे. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुरनं. १४१ / २०२३ कलम ३९९, ४०२ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"