पाेलिसांचा तिर्रटवर छापा; दहा जुगाऱ्यांविराेधात गुन्हा दाखल

By राजकुमार जोंधळे | Updated: April 27, 2025 03:24 IST2025-04-27T03:23:51+5:302025-04-27T03:24:32+5:30

सहा लाखांचा मुद्देमाल जप्त...

Police raid Tirurt; Case registered against ten gamblers | पाेलिसांचा तिर्रटवर छापा; दहा जुगाऱ्यांविराेधात गुन्हा दाखल

पाेलिसांचा तिर्रटवर छापा; दहा जुगाऱ्यांविराेधात गुन्हा दाखल

लातूर : शहरातील खाेरी गल्ली, मित्र नगर भागात सुरु असलेल्या तिर्रट जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी छापा मारला. यावेळी दहा जुगाऱ्यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून रोकड, वाहने, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा ५ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरासह जिल्ह्यात माेठ्या प्रमाणावर सुरु असलेल्या अवैध व्यवसायविराेधात कारावाई करण्याचे आदेश जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी आदेश दिले हाेते. दरम्यान, अप्पर पाेलिस अधीक्ष डाॅ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी लातुरात खाेरी गल्ली, मित्र नगर भागात एका घरासमाेरील मोकळ्या जागेत सुरु असलेल्या तिर्रट जुगारावर छापा मारला. यावेळी दहा जुगाऱ्यांना पाेलिसांनी अटक केली. यावेळी राेख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ५ लाख ८९ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अझर महेबूब शेख, जमीर खाजामिया शेख, अलफैज रुक्मुद्दीन शेख, समीर अमीर शेख, अल्तमश अयुब पठाण, सोहेल रसूलशहा बर्फीवाले, अरबाज पठाण, बुरहान लायक सय्यद, जैद नसीरखान पठाण आणि जैद चांद शेख यांच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलिस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, अमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे, नितीन कटारे यांच्या पथकाने केली.

Web Title: Police raid Tirurt; Case registered against ten gamblers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.