शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
3
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
4
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
5
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
6
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
7
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
8
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
9
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
10
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
11
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
12
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
13
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
14
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
15
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
16
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
17
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
18
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
19
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
20
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
Daily Top 2Weekly Top 5

शिवभोजन थाळीचा ५ हजारांवर लाभार्थ्यांनी घेतला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:18 IST

नागरिकांना केवळ दहा रुपयांत भोजन उपलब्ध करून देणारी योजना महाविकास आघाडीच्या सरकारकडून एप्रिल २०२० पासून राबविण्यात येत आहे. प्रारंभीला ...

नागरिकांना केवळ दहा रुपयांत भोजन उपलब्ध करून देणारी योजना महाविकास आघाडीच्या सरकारकडून एप्रिल २०२० पासून राबविण्यात येत आहे. प्रारंभीला या योजनेची सुरुवात जिल्हा आणि मोठ्या शहरांमधून करण्यात आली. त्यानंतर कोरोनाचे संकट सुरू होताच ही योजना तालुकास्तरावर राबविण्याचे नियोजन करण्यात आले. तालुक्याच्या ठिकाणीही शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आली. १० रुपयांना असणारी शिवभोजन थाळी कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाने केवळ पाच रुपयांत लाभार्थ्यांना जेवण देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला. शासनाकडून शहरी व ग्रामीण भागासाठी प्रतिथाळी केंद्रचालकांना अनुदान दिले जाते.

लॉकडाऊनच्या काळात अनेक उद्योग, व्यवसाय बंद पडले. अनेकांचे रोजगार बंद झाले. हातावर पोट असणाऱ्या लोकांना दोनवेळचे जेवण मिळणे अवघड झाले. अशावेळी लोकांची उपासमार होऊ नये, यासाठी अहमदपूर शहरात तीन शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली. या केंद्रांच्या माध्यमातून शासनाकडून दररोज ३५० थाळींचे वितरण करण्यात येत आहे. लोकांना पाच रुपयांत भाेजन देण्याच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेला नागरिकांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अहमदपूर तालुक्यात एप्रिल २०२० ते मार्च २०२१ अखेर जवळपास ५ हजारांवर नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत अनेकांनी या थाळीचा लाभ घेतला असून, अत्यल्प दरात शिवभोजन उपलब्ध होत असल्याने सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. याचा जर ग्रामीण भागात विस्तार केला, तर ग्रामीण भागातील जनतेची सोय होणार आहे.

सामान्यांना परवडणारी थाळी...

कोरोना काळात गोरगरीब जनतेला शिवभोजन थाळीचा माेठा आधार मिळाला आहे. जनतेच्या खिशाला परवडेल असे दर असल्याने जनतेची सोय झाली असून, महाविकास आघाडीने शिवभोजन थाळी हा उपक्रम महत्त्वाचा आहे, असे शिवभोजन थाळी केंद्रचालक आशिष तोगरे म्हणाले, तर अहमदपूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील शिवभोजन थाळी केंद्रातून हमाल, मुनीम, शेतकऱ्यांना याचा लाभ हाेत आहे, असे केंद्रचालक रविशंकर गादगे म्हणाले.