शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खामसवाडीत अफूची शेती! ३० गोण्या अफू जप्त

By राजकुमार जोंधळे | Updated: February 14, 2025 23:32 IST

याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती...

कळंब (जि. धाराशिव) : भल्या सकाळी शिराढोण पोलिसांचे पथक थेट कार्यक्षेत्रातील एका गावाचे शिवार गाठते. तेथील एका शेतकऱ्याच्या शेतात पोलिसांची पावले पडतात. इथं त्यांना चक्क उसाच्या फडात ‘अफू’चे आंतरपीक दिसते. दिवसभर पंचनामा, काढणी, मोजणी करून तीस एक छोट्या गोण्या घेऊन ठाण्यात पोलिस दाखल होतात. ही खळबळजनक कारवाई कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे करण्यात आली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

शिराढोण (ता. कळंब) पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील खामसवाडी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात अफूची झाडे लावली असल्याची गोपनीय माहिती शिराढोण पोलिसांना मिळते. जिल्हा पोलिस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ शिराढोण पोलिस ठाण्याचे सपोनि. कल्याण नेहरकर, पोउपनि. अनिल तांबडे व अंमलदाराचे पथक त्या अमली पदार्थाच्या शोधार्थ खामसवाडी मंगरूळ रस्त्यावरील भवानी शेत परिसरातील एका शेतकऱ्याचे शेत गाठते. याठिकाणी त्यांना उसाच्या फडात आंतरपीक म्हणून घेतलेली अफूची झाडे दिसून आली.

याची तत्काळ वरिष्ठांना माहिती देत पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली. यानंतर कळंब पोलिस ठाण्याची कुमकही दाखल झाली. दिवसभर याची चौकशी चालली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. या क्षेत्रातील अफूच्या झाडाला बोंडे लागलेली दिसून आली. यानंतर रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कारवाई सुरू होती. शिराढोण पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी ठाण मांडून होते. याची परिसरात चर्चा सुरू झाली अन् एकच खळबळ उडाली.

मोजमाप उशिरापर्यंत चालले... -घटनास्थळावर पंचनामा झाला. यानंतर त्या पिकाची काढणी झाली. ते छोट्या गोण्यांत भरण्यात आले. हे पीक तीस गोण्यांपेक्षा जास्त होते. घटनास्थळी मोजणी झाल्यावर परत रात्री शिराढोण पोलिस ठाण्यात पथक अन् मुद्देमाल रवाना झाला. तिथे परत एकदा मोजणी केल्याचे समजते. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. याप्रकरणी सपोनि. कल्याण नेहरकर यांच्याशी संपर्क साधला असता, माहिती गुन्हा दाखल झाल्यावर देण्यात येईल, असे सांगण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीPoliceपोलिस