शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

२ ते ६ रुपये किलोचा भाव...कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर लॉकडाऊन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 16:11 IST

लॉकडाऊनपूर्वी लातूरच्या बाजारात कांद्याला प्रति क्विंटल ८०० ते ९०० रुपये दर मिळत होता. आता मात्र ग्राहक नाही. आवक वाढली, त्यामुळे कांदा प्रति क्विंटल २०० ते ६०० रुपयांप्रमाणे विकत आहे.

ठळक मुद्देलातूरच्या बाजारात कांद्याची उच्चांकी आवक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही पदरी पडेना

- आशपाक पठाण 

लातूर : लॉकडाऊनमुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असून, देशातील विविध ठिकाणच्या नामांकित बाजारपेठा बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फरफट होत आहे. हैदराबाद, सोलापूर, लासलगाव आदी भागांत जाणारा कांदा  लातूरच्या बाजारात येत आहे. त्यामुळे महात्मा फुले भाजीपाला मार्केटमध्ये इतिहासात पहिल्यांदाच कांद्याची विक्रमी आवक झाली आहे.

लातूरचा आडत बाजार रोखीच्या व्यवहारात प्रसिद्ध असला तरी बाजार समितीअंतर्गत असलेल्या महात्मा फुले भाजीपाला मार्केटमध्ये मात्र स्थानिक शेतकऱ्यांव्यतिरिक्त बाहेरून येणारी फारशी आवक नव्हती. येथील बाजारात ५०० ते ६०० क्विंटलच्या वर कांद्याची आवक कधीही पोहोचलेली नव्हती. लॉकडाऊनमुळे  मात्र भाजीपाला बाजारात कांद्याची आवक दुप्पट नव्हे तर तिप्पट झाली आहे. इतिहासात पहिल्यांदाच दीड हजार क्विंटलनहून अधिक आवक झाल्याची नोंद झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर असलेल्या महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक सुरू झाल्याने जागा पुरत नव्हती. परिणामी, फिजीकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला होता. गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून भाजीपाला बाजार रिंगरोड लगत असलेल्या पशुधनाच्या बाजारात सुरू करण्यात आल्याने महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये आता बाहेरच्या शेतकऱ्यांची अधिक वर्दळ आहे.

हैदराबाद, सोलापूरकडे जाणारा कांदा लातूरला...लातूर, उस्मानाबाद, बीड, नगर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हैदराबाद, सोलापूर, लासलगाव येथील बाजारात कांदा विक्री करीत होते. लॉकडाऊनमुळे तेथील बाजारपेठ सध्या बंद आहे. त्यामुळे बीड, केज, परळी, उस्मानाबाद, तुळजापूर आदी भागांतील शेतकरी लातूरच्या भाजीपाला बाजारात कांदा घेऊन येत आहेत. सोमवारी १ हजार ५५० क्विंटलची आवक असून, इथल्या बाजारातील उच्चांकी आवक आहे, असे महात्मा फुले भाजीपाला मार्केटचे प्रमुख वसंत पवार यांनी सांगितले.

२ ते ६ रुपये किलोचा भाव...उन्हाळी हंगामात पाण्याचे प्रमाण कमी असते. उन्हाची तीव्रताही अधिक असल्याने मेहनत अधिक करावी लागते. यावर्षी उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असले तरी लॉकडाऊनमुळे जिथे अधिक भाव मिळतो, अशा बाजारपेठा बंद आहेत. शिवाय, आठवडी बाजारही बंद आहे. त्यामुळे अनेक शेतकरी मिळेल तो दर पदरी पाडून घेत कांद्याची विक्री करीत आहेत. लातूरच्या बाजारात २ रुपयांपासून ६ रुपयापर्यंत प्रति किलो दर शेतकऱ्यांच्या पदरी पडला. त्यातही वाहनभाडे, काढणीचा खर्च, आडतीवरील खर्च  असे एकूण गणित केल्यास पदरी निराशेशिवाय काहीच नाही, अशी भावना कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. लॉकडाऊनपूर्वी लातूरच्या बाजारात कांद्याला प्रति क्विंटल ८०० ते ९०० रुपये दर मिळत होता. आता मात्र ग्राहक नाही. आवक वाढली, त्यामुळे कांदा प्रति क्विंटल २०० ते ६०० रुपयांप्रमाणे विकत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदाlaturलातूर