चाेरीतील दुचाकीसह एका आराेपीला अटक, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...

By राजकुमार जोंधळे | Updated: January 27, 2024 19:08 IST2024-01-27T19:07:55+5:302024-01-27T19:08:11+5:30

आरोपीकडून चाेरीतील दाेन दुचाकी पाेलिसांनी जप्त केल्या आहेत.

One arrested with two wheeler in theft, Latur local crime branch action... | चाेरीतील दुचाकीसह एका आराेपीला अटक, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...

चाेरीतील दुचाकीसह एका आराेपीला अटक, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...

लातूर : चाेरीतील दाेन दुचाकीसह एकाला लातुरातील बाजार समितीच्या परिसरातून अटक करण्यात आली आहे. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने लातूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी आराेपींचा शाेध घेण्यात येत हाेता. रेकाॅर्डवरील गुन्हेगारांची माहिती मिळवताना चाेरीतील दुचाकी लातुरात बाजार समिती परिसरात विक्री करण्यासाठी एक संशयित फिरत असल्याची माहिती खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे पाेलिस पथक बाजार समितीच्या परिसरात धडकले. दुचाकीसह थांबलेल्या एकाला विश्वासात घेत अधिक चाैकशी केली असता, करणवीर महावीरसिंग चव्हाण (वय ३०, रा. मंठाळे नगर, लातूर) असे त्याने आपले नाव सांगितले.

ताब्यातील दुचाकी काही महिन्यांपूर्वी लातूर येथील तहसील येथून पळविली असून, गूळ मार्केट परिसरातूनही एक दुचाकी पळविली, असे सांगितले. याबाबत आरोपीला ताब्यात घेत शिवाजीनगर आणि गांधी चौक ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या दुचाकीबाबत कसून चाैकशी केली. आरोपीकडून चाेरीतील दाेन दुचाकी पाेलिसांनी जप्त केल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे नवनाथ हासबे, तुराब पठाण, जमीर शेख, राजाभाऊ मस्के, मोहन सुरवसे, नकुल पाटील यांच्या पथकाने केली.

Web Title: One arrested with two wheeler in theft, Latur local crime branch action...