नांदेडच्या पाेलीस पथकाचा उदगीरात मटक्यावर छापा, १२ जुगाऱ्यांविराेधात गुन्हा, एकाच वेळी दाेन ठिकाणी कारवाई...
By राजकुमार जोंधळे | Updated: March 10, 2026 21:55 IST2026-03-10T21:49:46+5:302026-03-10T21:55:49+5:30
Latur Crime News: नांदेड येथील विशेष उप-महानिरीक्षकांनी स्थापन केलेल्या पथकाडून उदगीर शहर, ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत साेमवारी एकाचवेळी मटका अड्ड्यांवर छापा मारण्यात आला. या वेगवेगळ्या दाेन्ही कारवायांमध्ये पाेलिस पथकाने एकूण १ लाख २८ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नांदेडच्या पाेलीस पथकाचा उदगीरात मटक्यावर छापा, १२ जुगाऱ्यांविराेधात गुन्हा, एकाच वेळी दाेन ठिकाणी कारवाई...
- राजकुमार जाेंधळे
लातूर - नांदेड येथील विशेष उप-महानिरीक्षकांनी स्थापन केलेल्या पथकाडून उदगीर शहर, ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत साेमवारी एकाचवेळी मटका अड्ड्यांवर छापा मारण्यात आला. या वेगवेगळ्या दाेन्ही कारवायांमध्ये पाेलिस पथकाने एकूण १ लाख २८ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी १२ आरोपींना पकडण्यात आले. याबाबत उदगीर पाेलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नांदेड परिक्षेत्रातील लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगाेली जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध व्यवसायांविराेधात पोलिस उप-महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी विशेष पथके नेमली आहेत. या पथकांकडून कारवाई केली जात आहे. साेमवार, ९ मार्च रोजी उदगीर परिसरात दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
पहिली कारवाई : उदगीर शहरात करण्यात आली. एका पडक्या घरात सुरू असलेल्या मटका बुकीवर छापा मारुन पोलिसांनी ५१ हजार ७९० रुपयांची रोकड आणि २० हजारांचे तीन मोबाईल जप्त केले. याबाबत ९ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध उदगीर शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई : उदगीर ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील एस.टी. कॉलनीत एका पत्राच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारण्यात आला. यावेळी पोलिसांनी २१ हजार ३३० रुपयांची रोकड, २० हजारांचे दाेन मोबाईल, १५ हजाराचे लॉटरीचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. यावेळी तिघा आरोपींना ताब्यात घेतले असूनप, उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही कारवायांत ७३ हजार १२० रुपयांची रोकड, पाच मोबाईल आणि इतर साहित्य असा सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक पंकज इंगळे, प्रदीप खानसोळे, संजीव निकलवाड, गणेश धुमाळ, कामाजी गवळी यांच्या पथकाने केली.
‘खबर हेल्पलाईन’वर नागरिकांनाे माहिती द्या...
‘नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. आपल्या भागातील अशा प्रकारच्या माहितीसाठी जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. शिवाय, ९१ ५० १०० १०० या ‘खबर हेल्पलाइन’वर माहिती द्यावी. - शहाजी उमाप, पाेलिस उप-महानिरीक्षक, परिक्षेत्र, नांदेड.