लातूर शहरात तरुणाचा खून, डाॅक्टरांच्या अहवालानंतर दाेघांवर गुन्हा दाखल
By राजकुमार जोंधळे | Updated: September 14, 2023 02:11 IST2023-09-14T02:11:12+5:302023-09-14T02:11:47+5:30
यासंदर्भात गांधी चाैक ठाण्यात दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूर शहरात तरुणाचा खून, डाॅक्टरांच्या अहवालानंतर दाेघांवर गुन्हा दाखल
लातुरमधील गंजगोलाईवरील दुसऱ्या मजल्याच्या छतावर महापूर येथील एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात गांधी चाैक ठाण्यात दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पाेलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकाेडे यांनी बुधवारी दिली.
पाेलिसांनी सांगितले, सलमान उर्फ दस्तगीर शहाबुद्दीन शेख (वय ३० रा.महापूर) यास लातुरातील गंजगाेलाईच्या दुसऱ्या मजल्याच्या छतावर नेऊन अंगा-खांद्यावर, डाेक्यावर, ताेंडावर जबर मारहाण करून खून करण्यात आला. याबाबत प्रथम आकस्मिक मृत्यूची नाेंद केली हाेती. दरम्यान, शवविच्छेदननंतर डाॅक्टरांचा अहवाल आला. यातून या तरुणाचा खून केल्याचे समाेर आले. या प्रकरणी अनवर शेख, विशाल दणदिवे (दाेघेही रा.लातूर) यांच्याविराेधात गांधी चाैक पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.