महापालिकेच्या ट्रॅक्टरने दोघांना उडविले, जखमींवर उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 20:58 IST2018-10-25T20:57:31+5:302018-10-25T20:58:04+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साळे गल्ली येथून रिंग रोडकडे कचरा घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरने साठफुटी रस्त्यावर दोघांत उडविले.

महापालिकेच्या ट्रॅक्टरने दोघांना उडविले, जखमींवर उपचार सुरू
लातूर - शहरातील साळे गल्ली येथील साठफुटी रोड येथे महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने दोघांना उडविल्याची घटना गुरुवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साळे गल्ली येथून रिंग रोडकडे कचरा घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरने साठफुटी रस्त्यावर दोघांत उडविले. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवाय, यामध्ये दोन दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक फौजदार तरुडे यांनी दिली.